शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरच्या भूमिपुत्रांनी केलेल्या प्रयत्नातून दोन रुग्णालयातील रुग्णांना मिळणार श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

‘ॲग्रीकाॅस नवापूर’ नवापूर या नावाने तयार करण्यात आलेल्या या ग्रुपच्या माध्यमातून खांडबारा व विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन पाइपलाइनचा खर्च ...

‘ॲग्रीकाॅस नवापूर’ नवापूर या नावाने तयार करण्यात आलेल्या या ग्रुपच्या माध्यमातून खांडबारा व विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन पाइपलाइनचा खर्च उचलण्यात आला आहे. कृषी पदवीधरांच्या या सोशल ग्रुपतर्फे खांडबारा व विसरवाडी येथे ऑक्सिजन पाइपलाइनसोबतच सिलिंडर पुरवठा बाबतही कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी लागणारा खर्च ग्रुपच्या सदस्यांनी दोन लाख ९५ हजारांचा निधी वर्गणी करून जमा केला होता. ग्रुपचे सदस्य कृषी पदवीधर असून नवापूर तालुक्याचे भूमिपुत्र आहेत. कृषी पदवी प्राप्त करून वेगवेगळ्या खात्यांमध्ये सेवा करीत आहेत. तालुक्यातील गरजू रुग्णांना त्याचा फायदा होईल या उद्देशाने हे काम हाती घेतले आहे. ग्रुपमधील सदस्य, हे पोलीस, महसूल, कृषी,अर्थ व इतर खात्यामध्ये वेगवेगळ्या उच्च पदांवर कार्यरत आहेत. सर्वांनी कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे व वेळोवेळी साबणाने हात धुवून कोरोना महामारीपासून बचाव करायचा आहे, असे सर्व समावेशक आवाहन केले आहे. या उपक्रमासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी विलास पाडवी, चोपडा तहसीलदार अनिल गावीत, जीएसटी उपायुक्त दिलीप गावीत, भारतीय स्टेट बँक अधिकारी रविकांत वळवी, नवापूर तालुका कृषी अधिकारी बापू गावीत, पोलीस निरीक्षक दिलीप वळवी, पोलीस निरीक्षक सतीश गावीत, सुरेश गावीत, अनिल पाडवी, रवी गावीत यांनी मार्गदर्शन केले होते. ग्रुपकडून करून देण्यात आलेल्या निधीतून केलेल्या पाइपलाइनमधून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात ३० तर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात २० बेड हे ऑक्सिजनयुक्त राहणार आहेत. यातून याठिकाणी दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांना सहज उपचार देऊन कोरोनावर मात करता येणे शक्य होणार आहे.