शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

शहादा प्रकाशा रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोळदे ते खेडदिगर रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असून, लॉकडाऊनमुळे ते बंद आहे. शहादा ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोळदे ते खेडदिगर रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असून, लॉकडाऊनमुळे ते बंद आहे. शहादा ते प्रकाशा रस्त्यावरी डामरखेडा गावाजवळ रस्ता रूंदीकरणासाठी उखडण्यात आला आहे. मात्र त्यानंतर कामबंद झाल्याने रस्त्यावरील धुळीमुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यावरील मातीमुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडत असल्याने दुचाकीधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच धुळीमुळे समोरील वाहन दिसत नसल्याने दुचाकीस्वारांमध्ये अपघाताच्या घटनाही घडत असून, संबंधित ठेकेदाराने या मातीच्या रस्त्यावर पाणी शिंपडण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
शहादा ते प्रकाशा दरम्यानच्या कच्च्या रस्त्यावरून मोठे व अवजड वाहन गेल्यास प्रचंड धूळ उडते या धुळीमुळे समोरचे काहीच दिसत नसल्याने दुचाकीस्वारांचे अपघात होत आहे.
डामरखेडा गावातून जाणारा रस्ता कोरल्यामुळे गावामधील रस्त्यावर प्रचंड माती असल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. ही धूळ रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या घरांमध्ये जात असल्यामुळे नागरिकांनाही या धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर अवजड वाहनांची वर्दळ राहत असल्याने उडणारी धूळ सरळ घरात येते. त्यातच गावातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी बसणेदेखील मुश्कील झाले आहे.
या धुळीमुळे रस्त्यावरून नियमित ये-जा करणाऱ्यांना खोकला, त्वचारोग आदींना सामोरे जावे लागत आहे. ज्याठिकाणी मातीचा रस्ता आहे. तेथे संबंधित ठेकेदाराने नियमित पाणी शिंपडण्याची गरज असून, रस्ता रूंदीकरणाच्या कामाला गती देऊन हे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी त्रस्त वाहनधारक व गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.