शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशयाचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:00 IST

हिरालाल रोकडे । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मध्य प्रदेशातील बनावट मद्य वाहतुकीसाठी कुख्यात असलेल्या शहादा तालुक्यात विशेषत: शहादा ...

हिरालाल रोकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मध्य प्रदेशातील बनावट मद्य वाहतुकीसाठी कुख्यात असलेल्या शहादा तालुक्यात विशेषत: शहादा शहरात बनावट मद्य निर्मिती व त्याची विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे जुन्या पोलीस ठाण्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शहादा-खेतिया या मुख्य रस्त्यापासून ३०० मीटर आत भर वसाहतीत हा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने उघडकीस आणून स्थानिक पोलीस व उत्पादन शुल्क प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे, अशी चर्चा शहरात सुरू आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील भरारी पथकाने तीन मार्चला मालोणी शिवारातील बनावट मद्याची निर्मिती व त्याची विक्री करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून सुमारे १२ लाख ६६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरुवारी या घटनेची वृत्तपत्रात छापून येताच स्थानिक पोलीस प्रशासन अचानक गतिमान झाले. गुरुवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत तपास सुरू केला. एका कॉन्स्टेबलने घटनास्थळाचा पंचनामा केला. कारवाई झाल्यानंतर दोन दिवसांनी पोलीस प्रशासन सक्रीय झाल्याने याठिकाणी सुरू असलेला हा प्रकार खरोखरच स्थानिक पोलीस प्रशासनाला माहिती नव्हता की नाशिक येथील पथकाने कारवाई केल्यानंतर आपल्या हद्दीत हा प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासन अचानक गतिमान झाले आदी गहन प्रश्न निर्माण झाले आहेत.नाशिक येथील भरारी पथकाने कारवाई केल्यानंतर दोन संशयित आरोपींना अटक करण्यात यश आले असले तरी यातील मुख्य सूत्रधार अद्याप कारवाईच्या कक्षेबाहेर आहे. तर भटू वाणी नामक एक संशयित फरार आहे. भर वसाहतीत हा कारखाना गेल्या सहा महिन्यापासून सुरू होता, अशी माहिती स्थानिक परिसरातील लोकांनी दिली. आजपर्यंत शहादा तालुक्यातून केवळ बनावट मद्याची वाहतूक गुजरात राज्यात होते हे स्पष्ट झाले होते. मात्र भर वसाहतीत बनावट मद्याची निर्मिती व त्याची विक्री होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलीस प्रशासन यांना माहिती नव्हती असे म्हणणे थोडे धाडसाचे म्हणावे लागेल. कोणातरी मोठ्या गॉडफादरच्या आशीर्वादाने एवढा मोठा उद्योग सुरू असताना त्याची भणक कोणालाही लागली नाही हेही आश्चर्यच म्हणावे लागेल. परिसरातील अनेक ढाब्यावर विनापरवाना अवैधरित्या मद्याची विक्री होत असताना यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी गेल्या सहा महिन्यापासून शहादा शहर व तालुका परवानाधारक बिअरबार परमिट रूम चालक-मालक संघटना जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करीत असतानाही विनापरवाना मद्य विक्री थांबली नाही. उलट ती दिवसेंदिवस वाढत राहिली. यामुळे अवैध मद्य विक्रीला राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलीस प्रशासन यांचा आशीर्वाद असल्याचे स्पष्ट होते.भरारी पथकाने आता ही कारवाई केल्यानंतर सदर ठिकाणी बनावट मद्याची निर्मिती होऊन त्याची विक्री कुठे झाली याचाही तपास करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अटकेत असलेले दोघे व फरार असलेला एक संशयित आरोपी यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचा यात सहभाग आहे त्याचाही पदार्फाश करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे येथे निर्मित बनावट मद्य हे शहरासह जिल्ह्यात विक्री झाले की थेट गुजरात राज्यात यादृष्टीने तपास होणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणामागे कार्यरत असलेल्या साखळीचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीररित्या कठोर कारवाई करण्यासाठी पारदर्शकपणे तपास होणे आवश्यक आहे. तरच या कारवाईला कुठेतरी अर्थ राहील अन्यथा भरारी पथकाने कारवाई केल्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा हा उद्योग राजरोसपणे सुरू राहील यात तिळमात्र शंका नाही.

नंदुरबार जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी नंदुरबार जिल्ह्याचा कारभार सांभाळल्यानंतर अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यादृष्टीने त्यांची आजपर्यंतची कारकीर्द सुरू आहे. केवळ या धंद्यांवर कारवाई नव्हे तर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे वगैरे प्रकार आढळून येतील त्या पोलीस ठाण्याच्या जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवरही त्यांनी कारवाई केल्याचे आजपर्यंत स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत शहाद्यात बनावट मद्य निर्मितीचा कारखाना नाशिक येथील भरारी पथक शोधून त्यावर कारवाई करते तर स्थानिक पोलीस प्रशासन यांना याबाबत कुठलीच माहिती मिळत नाही अशा परिस्थितीत शहादा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक आता काय कारवाई करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.