लॉकडाऊन शिथिल झाला तरी लहान मुलांना घराबाहेर सोडू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST2021-05-17T04:29:16+5:302021-05-17T04:29:16+5:30

नंदुरबार : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. लवकरच संचारबंदीत शिथिलता येऊन सर्वसामान्य परिस्थिती येण्याची अपेक्षा लागून आहे. ...

Don't leave small children out of the house even if the lockdown is relaxed! | लॉकडाऊन शिथिल झाला तरी लहान मुलांना घराबाहेर सोडू नका!

लॉकडाऊन शिथिल झाला तरी लहान मुलांना घराबाहेर सोडू नका!

नंदुरबार : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. लवकरच संचारबंदीत शिथिलता येऊन सर्वसामान्य परिस्थिती येण्याची अपेक्षा लागून आहे. असे झाले तरी लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नका... असा सल्ला वैद्यकीय मंडळी देत आहेत. येणाऱ्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक फटका बसणार असल्याचा इशारा यापूर्वीच विविध पातळींवरून देण्यात आलेला आहे.

कोरोनाचे नियम पाळण्याबाबत लहान मुलांमध्ये पाहिजे तशी समज आलेली नसते. विशेषत: १२ वर्षांखालील मुलांबाबत पालकांनाच काळजी घ्यावी लागते. अशातच तिसरी लाट ही अशा वयोगटावर सर्वाधिक संक्रमण करणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या काळात संचारबंदीत शिथिलता येणार असली तरी लहान मुलांना घराबाहेर सोडताना आवश्यक ती सर्व काळजी घेणे गरजेचे ठरणार आहे. त्यातच जर शाळा सुरू झाल्या तर मोठी रिस्क ठरणार आहे. त्यामुळे सर्वच दृष्टीने विचार करून निर्णय घेणे प्रशासनासह पालकांनाही गरजेचे आहे.

लहान मुलांना कोरोनाची लक्षणे काय

मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांमध्येदेखील ताप, सर्दी, खोकला ही सर्वसामान्य लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे दिसून येताच लागलीच वैद्यकीय उपचार घ्यावा.

लहान मुलांमध्ये ताप चढउतार होत असल्यास लागलीच रक्त-लघवी तपासणी करून शरीरातील पेशींचे प्रमाण जाणून घेत त्यानुसार उपचार सुरू करावे.

कफचे प्रमाण जास्त असल्यास नियमित न्यूमोनियाचा उपचार जसा केला जातो त्याप्रमाणेच उपचार करतात. वेगळ्या व मोठ्या लोकांना जसा कोरोनाचा उपचार केला जातो तसा होत नाही. त्यामुळे वेगळी उपचाराची पद्धत नाही.

Web Title: Don't leave small children out of the house even if the lockdown is relaxed!