शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाऊनलोड करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:31 IST

नंदुरबार : सध्या मोबाईलवर बँकिंग व्यवहार होत आहेत. यातच मोबाईलवरुनच काही मिनिटातच लाखोंचे कर्ज मंजूर करुन देतो. यासाठी हे ...

नंदुरबार : सध्या मोबाईलवर बँकिंग व्यवहार होत आहेत. यातच मोबाईलवरुनच काही मिनिटातच लाखोंचे कर्ज मंजूर करुन देतो. यासाठी हे ॲप डाऊनलोड करा, असे मेसेज मोबाईलवर सध्या खोऱ्याने येत आहेत. या संदेशांना बळी पडून अनेकजण ॲप डाऊनलोड करत आहेत. परंतु हे सर्व धोकेदायक असून यातून क्षणातच बँक खात्यातील पैसे काढून घेण्याचे प्रकार घडले असून यातून काहींची फसवणूक झाली आहे.

अत्यंत गंभीर अशा या प्रकारांमुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगून काळजी घेणे गरजेचे आहे. ॲपच्या माध्यमातून व्यवहार करीत असताना बँक खाते रिकामे होईल, अशीच शक्यता असल्याने ॲप डाऊनलोडींगला बळी पडू नये असाच सल्ला सायबर सेल देत आहे. परिणामी ॲपद्वारे कोणत्याही प्रकारचा बँकिंग व्यवहार करताना काळजी ही प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. यातून फसवणूक टळून होणारे आर्थिक नुकसानही टळणार असल्याचे सायबर सेल सांगत आहे.

आजघडीस सर्वांकडे अँड्राॅईड मोबाईल आहे. आपले एखादे काम सुलभ आणि लवकर होण्यासाठी त्याचा वापर वाढला आहे. यातून मग ॲपद्वारे मेसेज येतात. ॲप अधिकृत आहेत का, याची खातरजमा वेळीच करायला हवी.

ॲप डाऊनलोड करताच बँक खाते साफ

ॲप डाऊनलाेड करत असताना त्याची अगोदर संपूर्ण माहिती घ्यायला हवी ; पण बहुतांश नागरिक असे करताना दिसत नाहीत. फसगत झाल्यावर ॲप बाबत नातेवाईक व कुटुंबीयांना माहिती दिली जाते.

आपल्याला येणारे मेसेज हे फेक आहेत की अधिकृत आहेत, याची सर्वात अगोदर खातरजमा करण्याची गरज आहे. कोणत्याही येणाऱ्या मेसेजला लागलीच प्रतिसाद देणे ही बाब समर्थनीय होऊ शकत नाही.

या आमिषापासून सावध !

मेसेजच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक संदर्भातील काही मजकूर येऊ शकतो. येणारा मजकूर हा कदाचित फेकदेखील असू शकतो. ते वेळीच ओळखायला हवे.

कर्ज उपलब्ध करून दिले जाईल अथवा अमूक वस्तूंची खरेदी केल्यास घसघशीत सूट मिळेल , सारखे अनेक प्रकारचे मेसेज आल्यास त्याच्या मोहात आपण पडायला नको.

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर आपण करू शकतात, त्याला काही आणि कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही, यासारखे बनावट मेसेज आपल्याला आल्यास प्रतिसाद देऊ नये.

केस १ : जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा या दोन तालुक्यात काही ठिकाणी ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. इन्स्टंट लोन या संकल्पनेमुळे फसगत झाल्याचे समोर येते. यात बँकेची संपूर्ण माहिती भरायला लावून त्याचा वापर करत चार्जेसच्या नावाने पैसे कपात झालेल्यांची संख्या मोठी आहे.

केस २ : तळोदा तालुक्यातील एकाने उत्सुकतेपोटी अँड्राॅईड मोबाईल घेतल्यावर त्याचा वापर सुरु केला. सहा महिन्यांपूर्वी लोन हवे का, म्हणून मेसेज सुरु झाले होते. या मेसेजला बळी पडून संपूर्ण माहिती भरुन दिल्यानंतर एकाच्या खात्यातून साधारण १० हजारापेक्षा अधिक रक्कम कपात करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नागरिकांनी त्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी काळजी घ्यायला हवी. ऑनलाईन व्यवहार करताना अथवा ॲपच्या माध्यमातून काम करत असताना त्याची पुरेशी माहिती जाणून घ्यावी. आर्थिक व्यवहारांपासून शक्यतो सावध रहावे.

- रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक

मोबाईलवर आलेल्या मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे ॲप डाऊनलोड करु नका.

ॲप डाऊनलाेड करण्यापूर्वी त्याची माहिती जाणून घ्या. त्यानंतरच ते ॲप डाऊनलोड करा.

चुकीने ॲप डाऊनलोड करुन फसवणूक झाली तर तातडीने यासंदर्भात पोलिसांना कळवा.