शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रथम क्रमांकावर आणणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्र सरकारच्या आंकाक्षित जिल्हा उपक्रमाअंतर्गत ३४ व्या स्थानावरून थेट पहिल्या स्थानावर मजल मारण्यासाठी जून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र सरकारच्या आंकाक्षित जिल्हा उपक्रमाअंतर्गत ३४ व्या स्थानावरून थेट पहिल्या स्थानावर मजल मारण्यासाठी जून २०२० ही डेडलाईन ठरविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले.नंदुरबार जिल्हा हा केंद्र शासनाने आकांक्षित जिल्हा म्हणून निवडला आहे. गेल्या वेळी देशातील एकुण जिल्ह्यांमध्ये नंदुरबार ३४ व्या क्रमांकावर होता. आता जिल्हा पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीस सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, वसुमना पंत आणि विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, अंगणवाडीत पोषण आहार नियमितपणे दिला जाईल याकडे विशेष लक्ष द्यावे. अमृत आहार योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अंगणवाडीबाहेर माहिती फलक लावावेत. गर्भवती महिलांना पोषण आहाराचे महत्व कळावे यासाठी त्यांचे समुपदेशन करावे. प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्या अधिकाराविषयी जाणीव करून द्यावी. अंगणवाडी दुरुस्ती आणि बालकांना गणवेशाची कामे सीएसआर निधीतून करण्यात यावी.पशू लसीकरण वेळेवर करण्यात यावे. कृषी विषयक योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावी. मोलगी व धडगावमध्ये बँक शाखा उघडण्यासाठी अग्रणी बँक व्यवस्थापकांनी प्रयत्न करावे. ग्रामपंचायतीत सर्व सेवा जूनपर्यंत आॅनलाईन करण्याचे प्रयत्न करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.दहावीच्या परिक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे व कॉपी प्रकारांना मदत करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला चालना देण्यासाठी कॉपीसारखे प्रकार रोखणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.बैठकीत आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत विविध मानकांचा आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम केल्यास जिल्हा वरच्या क्रमांकावर पोहचेल असा विश्वास जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केला.

आकांक्षित जिल्हा अंतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविले जात आहेत. त्यांना गती देण्यासाठी मात्र अपेक्षीत प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या बाबी मनावर घेवून संबधीत विभागांना सक्रीय करण्यासाठी गुरुवारची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे म्हणने देखील ऐकूण घेत त्यावर उपाय सुचविले. आता कामाला गतीची अपेक्षा आहे.