शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापनात जिल्हा अग्रेसर राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वच्छता आणि आरोग्य हे एकमेकांशी संबंधीत आहे. यामुळे ग्रामस्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीने सांडपाणी व घनकचरा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वच्छता आणि आरोग्य हे एकमेकांशी संबंधीत आहे. यामुळे ग्रामस्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीने सांडपाणी व घनकचरा संकलन व त्याचे व्यवस्थापन या विषयी नियोजन करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, शाखा अभियंता, उप अभियंता, गट संसाधन केंदाचे कर्मचारी यांच्यासाठी जिल्हास्तरीय सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम हॉटेल हिरा एक्झीक्युटीव्ह येथे आयोजित करण्यात आला. उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा बोलत होते. ते म्हणाले, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बेसलाईन सव्र्हेक्षणात शौचालयांची उभारणी करण्यात आलेली आहे. त्या शौचालयांचा नियमित  वापरा बरोबरच ग्रामीण भागातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन हा महत्वाचा प्रश्न आहे. यामुळे ग्रामपंचायतीने आपला वार्षिक कृतीआराखडा तयार करतांना केवळ रस्ते, गटारी यांना महत्व न देता या आराखड्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या विषयालाही प्राधान्य देण्यात यावे असे आवाहनही गौडा यांनी यावेळी केले. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या विषयावर ग्रामस्तरावर क्षमता बांधणी या उद्देशाने या तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.     प्रास्ताविक  उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी केले. प्रशिक्षणास मार्गदर्शक म्हणून महात्मा फुले समाज सेवा मंडळ, करमाळा सोलापुर येथील समन्वयक सचिन ङिांजाडे हे उपस्थित आहेत. त्यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण पाणीपुरवठाचे  कार्यकारी अभियंता पी.टी. बडगुजर, गट  विकास अधिकारी अशोक पटाईत, सहा. गट विकास अधिकारी दिनेश वळवी, साधन व्यक्ती सचिन     ङिांजाळे उपस्थित होते. सुत्र संचालन योगेश कोळपकर यांनी  केले.