मोलगी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते खावटी किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST2021-07-23T04:19:30+5:302021-07-23T04:19:30+5:30

कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मैनक घोष, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाज कल्याण सभापती ...

Distribution of khawati kits by the Guardian Minister at Molgi | मोलगी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते खावटी किटचे वाटप

मोलगी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते खावटी किटचे वाटप

कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मैनक घोष, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, सी.के. पाडवी, हरसिंग पाडवी, सीताराम पाडवी, ॲड. गोवाल पाडवी आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री ॲड. पाडवी यांनी खावटी योजनेंतर्गत राज्यातील बारा लाख कुटुंबांना लाभ देण्यात येणार आहे. खावटी अनुदान योजनेंतर्गत लाभार्थींच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये डीबीटीद्वारे वर्ग करण्यात येत असून, दुसऱ्या टप्प्यात खावटी किटच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू देण्यात येत आहेत. तांत्रिक कारणांमुळे योजनेचा लाभ न मिळालेल्या पात्र कुटुंबांनादेखील लाभ देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांची मोलगी पोषण व पुनर्वसन केंद्राला भेट

पालकमंत्री ॲड.पाडवी यांनी मोलगी ग्रामीण रुग्णालय व पोषण पुनर्वसन केंद्राला भेट दिली. कुपोषित बालकाचा आहार आणि उपचाराकडे योग्य लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधिताना दिले. तसेच बालकांच्या पालकांकडून उपचाराबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके उपस्थित होते.

Web Title: Distribution of khawati kits by the Guardian Minister at Molgi