शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकान इतरत्र स्थलांतरित केल्याने ४०० ग्राहकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

तळोदा : शहरातील खान्देशी गल्ली परिसरातील ग्राहकांसाठी असलेले रेशन दुकान संबंधित दुकानदाराने मनमानीपणे इतरत्र स्थलांतरित केल्याने साधारणत: ४०० ग्राहकांची ...

तळोदा : शहरातील खान्देशी गल्ली परिसरातील ग्राहकांसाठी असलेले रेशन दुकान संबंधित दुकानदाराने मनमानीपणे इतरत्र स्थलांतरित केल्याने साधारणत: ४०० ग्राहकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सोमवारी तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांना साकडे घातले. यावेळी गल्लीतच दुकानं सुरू करावे, अशी मागणी केली. अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तळोदा शहरातील खान्देशी गल्ली परिसरातील ग्राहकांसाठी प्रशासनाने स्वतंत्र स्वस्त धान्य दुकान दिले आहे. या दुकानास या तिन्ही गल्ल्यांमधील ४०५ ग्राहकांना जोडले आहे. यात १८५ अंत्योदय व २२० ग्राहक प्राधान्य योजनेतील आहेत. हे दुकान खान्देशी गल्लीत सुरू होते; परंतु संबंधित दुकानदाराने ग्राहकांना व पुरवठा शाखेस विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने गल्लीपासून एक, दीड किलो मीटर अंतरावर असलेल्या गवळी वाडा परिसरात नेले आहे. साहजिकच यामुळे ग्राहकांना मुख्य बाजारपेठ तुडवत रेशन घेण्यासाठी तेथे जावे लागत आहे. काही वृद्ध, अपंगांना खासगी रिक्षा करून धान्य आणावे लागत आहे. साहजिकच यामुळे ५० रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दुकानदार यास गल्लीतच दुकान थाटण्यासाठी ग्राहकांनी तोंडी सांगूनही साफ दुर्लक्ष करीत असल्याने शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा ठाकूर यांच्यासह ग्राहकांनी सोमवारी तहसील कार्यालय गाठून तहसीलदार गिरीश वाखारे यांच्यापुढे ग्राहकांनी कैफियत मांडली. दुकानदाराने मनमानीपणे दुकान इतरत्र हलवले आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली आहे. दुकान आमच्या परिसरातच पुन्हा सुरू करण्यास त्यास तंबी द्यावी. शिवाय धान्यही पुरेसे दिले जात नसल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला. याबाबत तातडीने कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी शहरप्रमुख जितेंद्र दुबे, आनंद सोनार, संजय पटेल, जगदीश चौधरी, विनोद वंजारी, श्रावण तीजविज, विपूल कुलकर्णी, विजय मराठे, सूरज माळी, कल्पेश सूर्यवंशी, जयेश सूर्यवंशी आदींसह ग्राहक उपस्थित होते. दरम्यान तहसीलदार गिरीश वाखारे यांनी याप्रकरणी चौकशी करून तेथेच दुकान सुरू करण्याची सूचना दुकानदारांस देण्याचे आश्वासन दिले.

पुरवठा शाखेने केली चौकशी

खान्देशी गल्ली परिसरातील नागरिकांनी आपल्या हक्काचे रेशन दुकान इतरत्र नेल्यामुळे सोमवारी सकाळी तहसीलदारांना साकडे घातल्यानंतर येथील पुरवठा शाखा खळबडून जागे झाले. त्या दिवशी दुपारीच पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी यांनी खान्देशी गल्ली परिसरातील ग्राहकांची भेट घेऊन प्रत्यक्ष चौकशी केली. त्यांनी दुकानदाराने येथून दुकान हलविल्यामुळे प्रचंड गैरसोयीस तोंड द्यावे लागत असल्याची व्यथा मांडली. शिवाय नियमानुसार धान्य देण्याची मागणीदेखील ग्राहकांनी त्यांच्यापुढे केल्याचे ग्राहकांनी सांगितले. दरम्यान, ज्या ठिकाणी दुकानदार दुकान चालवीत होता. ते घर भाड्याचे होते. पावसात ते गळत होते. शिवाय घरमालकाने घर खाली करण्यास सांगितले होते. त्यामुळे दुकान दुसरीकडे हलवावे लागल्याचे दुकानदाराचे म्हणणे आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी त्या परिसरातच स्वस्त धान्य दुकान असणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित दुकानदारांस घर शोधून पुन्हा तेथेच दुकान सुरू करण्याची सूचना दिली आहे. -गिरीश वाखारे, तहसीलदार, तळोदा.