शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

धडगाव तालुक्यावर पालकमंत्री के.सी.पाडवी यांचे वर्चस्व कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 13:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. शुक्रवारी झालेल्या मतदानाची मोजणी सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. शुक्रवारी झालेल्या मतदानाची मोजणी सोमवारी सकाळी १० वाजेपासून तहसील कार्यालयात तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आली आहे.राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. के. सी. पाडवी यांचा बालेकिल्ला असलेल्या या तालुक्यात ११ ग्रामपंचायती या काँग्रेसने कायम राखल्या आहेत. उर्वरित पाच ग्रामपंचायतींवर शिवसेनेने यश प्राप्त केले आहे. तालुक्यात होत असलेल्या यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुका या गेल्या काही वर्षांतील निवडणुकांपेक्षा वेगळ्या ठरल्या होत्या. प्रस्थापितांना युवा उमेदवारांनी आव्हान दिल्याने निवडणुकांकडे लक्ष लागून होते. दरम्यान, काँग्रेसनेही अनेक युवकांना संधी दिल्याने युवकांविरोधात युवक अशा लढती तालुक्यात झाल्या. यात काँग्रेस पुरस्कृत पॅनेलच्या उमेदवारांनी यश प्राप्त केलेतालुक्यातील काकडदा, खामला, सिसा, काकरपाटी, पाडली, वरखेडी, भोगवाडे खुर्द, धनाजे, उमराणी, मुंदलवाणी, हातधुई या ग्रामपंचायतींवर काँग्रेसने यश प्राप्त केले, तर घाटली, कुंडली, खर्डा, मनवाणी, आचपा या पाच ग्रामपंचायतींवर शिवसेना पुरस्कृत पॅनेलने विजय प्राप्त केला आहे. दरम्यान, तालुक्यातील सर्वाधिक लक्ष लागून असलेल्या काकडदा ग्रामपंचायतीवर माजी बांधकाम सभापती व धडगाव तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विक्रमसिंग वळवी यांच्या पॅनेलने यश मिळवले आहे. याठिकाणी रवींद्र बाज्या वळवी, दिना संतोष पाडवी, टीलू आपसिंग पाडवी, रवींद्र आपसिंग पाडवी, विनोद सत्तरसिंग मोरे, प्रीतम प्रदीप पाडवी, अनिता जामसिंग पाडवी यांनी, तर शिवसेना पुरस्कृत पॅनेलकडून पोपटीबाई बारक्या डोमखले, जयश्री मोग्या तडवी, भाईदास सांघा पटले, गुलाबीबाई भोलेनाथ रहासे हे उमेदवार विजयी झाले आहेत.