शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या नियमानुसार भाविकांनी घेतले केदारेश्वराचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाशिवरात्रीला भाविकांची किरकोळ वर्दळ दिसून आली. मंदिर ट्रस्टी व पोलीस प्रशासन यांच्या नियमानुसार आलेल्या भाविकांनी महादेवाचे ...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाशिवरात्रीला भाविकांची किरकोळ वर्दळ दिसून आली. मंदिर ट्रस्टी व पोलीस प्रशासन यांच्या नियमानुसार आलेल्या भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. गुरुवारी सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत बऱ्यापैकी भाविकांची गर्दी दिसून आली. या वेळी आलेल्या भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी मंदिर आणि पोलीस प्रशासनाने नियोजन केले होते. त्यानुसार पोलिसांनी सभामंडपात सोडताना पाच-पाच भाविक तर मंदिर गाभाऱ्यात चार-चार भाविकांना सोडण्यात आले होते.

याप्रसंगी भाविकांनी तोंडावर मास्क लावला आहे की, नाही याची खात्री पोलिसांकडून केली जात होती.

शहादाचे पोलीस निरीक्षक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे चार पोलीस कर्मचारी, महिला होमगार्ड ११ व पुरुष होमगार्ड आठ यांची मंदिर परिसरात नियुक्ती करण्यात आली होती.

तापी नदी घाट, केदारेश्वर मंदिर, गेटजवळ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मंदिर चौफुलीवरच बॅरिकेटिंग लावून वाहनांना अडविण्यात आले होते. तेथूनच मोजक्या लोकांना केदारेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी सोडण्यात आले होते. महाशिवरात्रीला नेहमीप्रमाणे होणारी गर्दी व भंडाऱ्याचे आयोजन दिसून आले नाही, शिवाय मंदिर परिसरामध्ये बाहेरगावातील दुकानदारही आले नाहीत, एकंदरीत शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत मोजक्याच लोकांनी दर्शन घेतले.

केदारेश्वर, काशी विश्वेश्वर, पुष्प दंतेश्वर, संगमेश्वर महादेव मंदिर, येथे भाविकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत घेतले दर्शन.

मंदिर प्रशासनाने लावले रुद्राक्षाचे झाड

केदारेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, संचालक सुरेश पाटील, अमोल पाटील, रामदास पाटील, रमेश साळी, आदींनी ऋषिकेश येथून आणलेले रुद्राक्षाचे झाड केदारेश्वर महादेवाच्या सान्निध्यात महाशिवरात्रीच्या दिवशी लावले.