‘अटल’ योजनेच्या लाभापासून अनुदानित शाळा वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:10 PM2020-02-17T12:10:31+5:302020-02-17T12:10:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : अटल आरोग्य वाहिनी आदिवासी जीवनदायी योजनेच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ...

Deprived of schools aided by the benefit of the 'Atal' scheme | ‘अटल’ योजनेच्या लाभापासून अनुदानित शाळा वंचित

‘अटल’ योजनेच्या लाभापासून अनुदानित शाळा वंचित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : अटल आरोग्य वाहिनी आदिवासी जीवनदायी योजनेच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत रूग्णवाहिकेचा लाभ अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी पालक वर्गाकडून केली जात आहेत.
शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय सोयीसुविधा मिळाव्यात व आश्रमशाळेतील विद्यार्थी मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी आदिवासी विकास विभागाकडून शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी अटल आरोग्य वाहिनी आदिवासी जीवनदायी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दोन वर्षांपूर्वी शासकीय आश्रमशाळांना स्वतंत्र रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थी जर आजारी पडला तर रूग्णवाहिकेला पाचारण करून त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात येते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेण्याबरोबर दुर्गम भागात असलेल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून या रुग्णवाहिकांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मात्र या रूग्णवाहिकांचा लाभ केवळ शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळत असून, अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थी या रुग्णवाहिकेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे अनुदानित आश्रमशाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शासकीय आश्रमशाळांप्रमाणेच अनुदानित आश्रमशाळादेखील दुर्गम व अतिदुर्गम भागात विखुरलेल्या आहेत. शासकीय आश्रमशाळांप्रमाणेच अनुदानित आश्रमशाळा या आदिवासी विकास विभागाकडूनच चालवण्यात येतात. फक्त त्यांचे व्यवस्थापन स्वतंत्र असते. अनुदानित आश्रम शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थीदेखिल आदिवासीच असतात. शासकीय आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या आरोग्य इतकेच अनुदानित आश्रमशाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे असते, असे असतांनादेखील अनुदानित आश्रम शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा दुजाभाव का असा प्रश्न पालकाकडून उपस्थित केला जात आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण १३ रुग्णवाहिका आश्रमशाळांसाठी उपलब्ध झाल्या असून, त्यापैकी सात तळोदा प्रकल्प तर सहा नंदुरबार प्रकल्पात कार्यरत आहेत. या रूग्णवाहिका क्लस्टरनिहाय मध्यवर्ती शासकीय आश्रमशाळेत तैनात असतात.
१०८ क्रमांकावर संपर्क साधला किंवा रूग्णवाहिकेचा चालक व त्यावरील अन्य कर्मचाऱ्यांशी संपर्क केला तर शासकीय आश्रमशाळेतील आजारी विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी रूग्णवाहिका आश्रमशाळेत दाखल होते व आवश्यकतेनुसार आजारी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात नेले जाते. परंतु या परिसरातील अनुदानित आश्रमशाळेतील बहुउद्देशीय कर्मचारी किंवा वेळप्रसंगी शिक्षकांना आजारी विद्यार्थ्यांस दवाखान्यात घेऊन जावे लागते. शिक्षक जर दवाखान्यात गेला तर त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते.
आश्रमशाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे आरोग्याचा विषय नेहमीच संवेदनशील मुद्दा राहिलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिक्षकच पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेत असल्याचा अनुभव आहे. अनेकदा तर शिक्षक तीन ते चार विद्यार्थ्यांना एकाच मोटरसायकलवर बसवून दवाखाण्यात उपचारासाठी घेऊन जात असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीमुळे अटल आरोग्य वाहिनी आदिवासी जीवनदायी योजनेंतर्गत शासकीय आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणाºया मोफत रुग्णवाहिकेचा लाभ अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनादेखील मिळणे गरजेचे झाले आहे.
दरम्यान, या रूग्णवाहिकाचा लाभ शासकीय आश्रमशाळां प्रमाणचे अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना ही मिळावा यासाठी अनुदानित आश्रमशाळांच्या संस्थाचालक संघटनेकडून आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.शशिकांत वाणी यांनी दिली आहे. याबाबत आदिवासी विकास विभाग सकारात्मक असून, लवकरच या संदर्भात कारवाई केली जाणार असण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
अनेक शासकीय व अनुदानित आश्रमशाळा ह्या जवळपासच्या अंतरावर व एकच मार्गावर आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार सोसता शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकांचा सहज लाभ मिळू शकतो. यासाठी केवळ अट शिथिल करण्याची आवश्यकता आहे. जर तसे झाले तर अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले जावून आजरी विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळण्यास मदत होणार असल्याने, पालक वर्गाकडून या मागणीने आता जोर धरला आहे.

Web Title: Deprived of schools aided by the benefit of the 'Atal' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.