पुसनद येथे कृषी विभागाचे बीजप्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:29 IST2021-05-23T04:29:25+5:302021-05-23T04:29:25+5:30

यावेळी जैविक खतांचा वापर व रोप अवस्थेतील येणाऱ्या रोगांपासून पिकांच्या संरक्षणासाठी कृषी सहायक सी. एस. शिंदे यांनी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक ...

Demonstration of Seed Processing and Seed Germination Ability Test of Agriculture Department at Pusanad | पुसनद येथे कृषी विभागाचे बीजप्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक

पुसनद येथे कृषी विभागाचे बीजप्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक

यावेळी जैविक खतांचा वापर व रोप अवस्थेतील येणाऱ्या रोगांपासून पिकांच्या संरक्षणासाठी कृषी सहायक सी. एस. शिंदे यांनी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून दाखवली. त्याचप्रमाणे एक किलो बियाणास २५ ग्रॅम याप्रमाणात रायझोबियम किंवा स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक चोळावे व त्यानंतर सावलीत सुकवून पेरणी करण्याविषयी माहिती व घरच्या घरी बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी कशी तपासावी, याबाबत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

शेतकऱ्यांना वाफे पद्धत व सरी-वरंबा पद्धत याविषयी कृषी पर्यवेक्षक के. डी. नाईक यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाडिबिटीअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. कार्यक्रमास कृषी सहायक जे. जे. भोई ससदे, बिलाडी त. सा. येथील कृषी सेवक एस. एस. गावीत व प्रगतशील शेतकरी चुनीलाल गोविंद पाटील, अशोक तुंबडू पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Demonstration of Seed Processing and Seed Germination Ability Test of Agriculture Department at Pusanad