शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
अंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
4
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
5
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
6
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
7
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
8
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
9
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
10
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
11
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
12
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
13
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
14
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
15
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
16
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
17
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
19
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
20
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
Daily Top 2Weekly Top 5

बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहाद्यातील मलोणी शिवारात भर वसाहतीत सुरू असलेल्या बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यात धाड टाकून दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहाद्यातील मलोणी शिवारात भर वसाहतीत सुरू असलेल्या बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यात धाड टाकून दोन संशयीतांना अटक केली. तब्बल १२ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. मुख्य सूत्रधार मात्र फरार झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या कारखान्याची माहिती स्थानिक पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला मिळू नये याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.विभागीय भरारी पथकाला मिळालेल्या माहितीवरून कांतीलाल उमाप, संचालक उषा वर्मा , विभागीय उप -आयुक्त अर्जुन ओहोळ, जिल्हा अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाच्या अधीकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. मलोनी शिवारातील माजिनगर-गफूरनगर येथे एका पत्र्याचे शेड वजा गोडावूनमध्ये धाड टाकली. या ठिकाणी बनावट मद्य निर्माण करण्यासाठी लागणारे इंपेरीअल ब्ल्यु व्हिस्की, आॅफिसर चॉइस ब्ल्यु व्हिस्की, मॅकडॉल नं. १ व्हिस्की, डि.एस.पी. ब्लॅक व्हिस्की, रॉयल स्टंग व्हिस्की, इंपेरीअल ब्ल्यु व्हिस्की, टँगो पंच देशी दारु, बॉम्बे स्पेशल व्हिस्की, बॉम्बे स्पेशल व्हिस्की यासाठी लागणारे पत्री बुचे, लेबल, बनावट दारु तयार करणेकामी लागणारे इसेन्स (सुगंधी सार) एकुण दोन लिटर ५०० मिली बनावट दारु तयार करणेकामी लागनारा कलर एकुण ६ लिटर, बनावट दारु तयार करते वेळी स्पिरीटची तिव्रता मापणेकामी वापरले जाणारे थर्मामिटर एकुण २ नग, कागदी पुठ्याचे रिकामे बॉक्स, ८,४०० प्लॅस्टिक बॉटल असा एकुण १२ लाख, ६६ हजार ५५० रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.घटनास्थळावर यम्मो उर्फ इरफान रशीद मनियार (२२) रा . खेतीया, साबिर मुशिर पिंजारी (४१) या दोन आरोपीत इसमांसह सदर मुद्येमाल जागेवरच जप्त करण्यात आलेला असून या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार भटू वाणी नामक संशयीत इसम फरार असुन त्याचा शोध सुरू आहे .ही कारवाई निरीक्षक आर. एम. फुलझळके, दुय्यम निरीक्षक एस. एस. रावते, डी. एन. पोटे, दुय्यम निरीक्षक नंदुरबार जी. जी. आहिरराव ए. आर. नाईकवडे, जवान गोकुळ शिंदे, दिपक आव्हाड, लोकेश गायकवाड, राजु पावरा, निलेश शेळके, संदिप वाघ यांनी पार पाडली. तपास दुय्यम निरीक्षक एस. एस. रावते हे करीत आहेत.दरम्यान, केवळ या कारवाई पुरते न थांबता बनावट मद्य तयार करणाºया कारखान्याचा मुख्य सूत्रधार व मास्टरमाईंड कोण, आतापर्यंत यांनी शहर व परिसरात कुठे कुठे बनावट मद्य विक्री केली, या गोरख धंद्याला आशीर्वाद कोणाचा याचा तपास गांभीर्याने होण्याची गरज आहे.