बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:01 IST2020-03-05T12:01:00+5:302020-03-05T12:01:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहाद्यातील मलोणी शिवारात भर वसाहतीत सुरू असलेल्या बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यात धाड टाकून दोन ...

Demolition of counterfeit liquor factory | बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उध्वस्त

बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहाद्यातील मलोणी शिवारात भर वसाहतीत सुरू असलेल्या बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यात धाड टाकून दोन संशयीतांना अटक केली. तब्बल १२ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. मुख्य सूत्रधार मात्र फरार झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या कारखान्याची माहिती स्थानिक पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला मिळू नये याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विभागीय भरारी पथकाला मिळालेल्या माहितीवरून कांतीलाल उमाप, संचालक उषा वर्मा , विभागीय उप -आयुक्त अर्जुन ओहोळ, जिल्हा अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाच्या अधीकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. मलोनी शिवारातील माजिनगर-गफूरनगर येथे एका पत्र्याचे शेड वजा गोडावूनमध्ये धाड टाकली. या ठिकाणी बनावट मद्य निर्माण करण्यासाठी लागणारे इंपेरीअल ब्ल्यु व्हिस्की, आॅफिसर चॉइस ब्ल्यु व्हिस्की, मॅकडॉल नं. १ व्हिस्की, डि.एस.पी. ब्लॅक व्हिस्की, रॉयल स्टंग व्हिस्की, इंपेरीअल ब्ल्यु व्हिस्की, टँगो पंच देशी दारु, बॉम्बे स्पेशल व्हिस्की, बॉम्बे स्पेशल व्हिस्की यासाठी लागणारे पत्री बुचे, लेबल, बनावट दारु तयार करणेकामी लागणारे इसेन्स (सुगंधी सार) एकुण दोन लिटर ५०० मिली बनावट दारु तयार करणेकामी लागनारा कलर एकुण ६ लिटर, बनावट दारु तयार करते वेळी स्पिरीटची तिव्रता मापणेकामी वापरले जाणारे थर्मामिटर एकुण २ नग, कागदी पुठ्याचे रिकामे बॉक्स, ८,४०० प्लॅस्टिक बॉटल असा एकुण १२ लाख, ६६ हजार ५५० रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
घटनास्थळावर यम्मो उर्फ इरफान रशीद मनियार (२२) रा . खेतीया, साबिर मुशिर पिंजारी (४१) या दोन आरोपीत इसमांसह सदर मुद्येमाल जागेवरच जप्त करण्यात आलेला असून या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार भटू वाणी नामक संशयीत इसम फरार असुन त्याचा शोध सुरू आहे .
ही कारवाई निरीक्षक आर. एम. फुलझळके, दुय्यम निरीक्षक एस. एस. रावते, डी. एन. पोटे, दुय्यम निरीक्षक नंदुरबार जी. जी. आहिरराव ए. आर. नाईकवडे, जवान गोकुळ शिंदे, दिपक आव्हाड, लोकेश गायकवाड, राजु पावरा, निलेश शेळके, संदिप वाघ यांनी पार पाडली. तपास दुय्यम निरीक्षक एस. एस. रावते हे करीत आहेत.
दरम्यान, केवळ या कारवाई पुरते न थांबता बनावट मद्य तयार करणाºया कारखान्याचा मुख्य सूत्रधार व मास्टरमाईंड कोण, आतापर्यंत यांनी शहर व परिसरात कुठे कुठे बनावट मद्य विक्री केली, या गोरख धंद्याला आशीर्वाद कोणाचा याचा तपास गांभीर्याने होण्याची गरज आहे.

Web Title: Demolition of counterfeit liquor factory