शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

वीज कनेक्शन खंडित करण्याची मोहिम थांबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने अधिवेशन संपविल्यानंतर थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यासाठी स्थगिती उठावली असल्यामुळे वीज वितरण ...

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने अधिवेशन संपविल्यानंतर थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यासाठी स्थगिती उठावली असल्यामुळे वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांकडून वीजबिल वसूल करण्याची मोहीम ३१ मार्चपर्यंत सुरू केली आहे. ३१ मार्चनंतर थकीत वीजबिलापोटी शेतकऱ्यांचे कनेक्शन खंडित करण्याची मोहीम राबवली जाणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे कनेक्शन खंडित करण्याचे काम सुरू आहे. हे अन्यायकारक असून, शेतकऱ्यांनी वापर केलेली वीज व दिलेले बिल यात जमीन आसमानाचा फरक आहे. शेतकऱ्यांच्या शेतात ना मीटर ना रिडिंग घेता अंदाजे भरमसाट बिले देऊन देशोधडीला लावण्याचे काम वीज महामंडळ करीत आहे.

कॉग्रेसच्या राज्यात शेतकरी संघटनेने शेती पंपाची वीजबिल प्रतिअश्वशक्ती वर्षाला ३०० वरून २८२० वर गेल्यामुळे शासनाच्या विरोधात आंदोलन केले होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आंदोलनावर तोडगा काढून शेतीसाठी २४ तास विजेकरीता ६७ टक्के वीजबिल भरेल व शेतकरी ३३ टक्के भरेल असा आदेश काढला होता. तरीही वीज कनेक्शन कंपनीने शेतकऱ्यांना १६ तास वीज न देत शासनाकडून २४ तासाचे पैसे घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज वितरण कंपनीकडून येणे असल्याचे पैसे घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज वितरण कंपनीकडून येणे असल्याने उच्च न्यायालयात दावा केल्याने महावितरण कंपनीने पुढील आदेश येईपर्यंत शेती पंपाचे वीज कनेक्शन खंडित करू नयेत असे स्पष्ट लेखी आदेश असून, सुद्धा शेतकऱ्यांना वीजतोडणीची धमकी देऊन चुकीचे वीज बिले वसूल केले जात असून, मार्चनंतर कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी शेतकऱ्यांना पुरेसा वीज पुरवठा होत नाही, शेतीमालाला हमी भाव नाही, बियाणे व औषधे, खताचे वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागेल. तरी आमची विनंती आहे की, चुकीचे वीज बिल वसुली व वीज कनेक्शन तोडणी बंद करण्यात यावी, अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर सत्यशोध ग्रामीण कष्टकरी सभेचे किशोर ढमाले, आर.टी. गावित, होमाबाई गावित, जगन गावित, जेका गावित, गोबजी गावित, गेवाबाई गावित, विक्रम गावितसह असंख्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.