शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानामुळे शीतपेयांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:30 IST

कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना उन्हाच्या तडाख्यात ही शीतपेये, रसवंतीगृहे दिलासादायक वाटत असल्यामुळे या शीतपेयांना व उसाच्या रसाला ग्राहकांची मागणी ...

कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना उन्हाच्या तडाख्यात ही शीतपेये, रसवंतीगृहे दिलासादायक वाटत असल्यामुळे या शीतपेयांना व उसाच्या रसाला ग्राहकांची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी शीतपेय घ्यावे लागत आहे.

लग्नसराई सुरू असल्यामुळे लग्नात मठ्ठा, ताक मोठ्या प्रमाणावर तयार केले जाते. उन्हाळ्यात तर बच्चे कंपनीला बर्फाच्या गोळ्याचे भलतेच आकर्षण असते. विविध रंग, चवीत उपलब्ध असलेला गोळा ज्येष्ठांमध्येही लोकप्रिय आहे. साधा गोळा, मावा गोळा, आईस प्लेट यासारखे प्रकार यात उपलब्ध असतात.

सकाळी ११ वाजेपासूनच उन्हाच्या झळा लागू लागत असल्याने दुपारनंतर तर उष्णता असह्य होते. शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यासाठी थंडपेयांचा आधार घ्यावा लागतो. काही क्षणांसाठी का होईना शीतपेये आराम देतात. - निंबा दीपचंद कोळी-ग्राहक.

विशेषत: संध्याकाळी रस पिण्यासाठी अधिक गर्दी असते. दुपारी अधिक ऊन असल्याने बहुतेक लोक घराबाहेर, कार्यालयाबाहेर पडायचे टाळतात. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले असतात. तसेच बस थांब्यावरही शुकशुकाट दिसून येतो. - मधुकर पाटील, विक्रेता, वडाळी

मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत जाईल, तसतसे ग्राहक वाढत जाईल, असे वाटते. या कोरोना परिस्थितीमुळे ग्राहकांची संख्या असमाधानकारक दिसून येत आहे. मात्र आम्ही जास्त विक्री कमी नफा तत्वावर ग्राहकांना उसाचा रस देत आहोत. यामुळे सर्वसामान्य नागरिक दुकानावर आकर्षित होत आहेत.