रस्ते दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST2021-03-29T04:18:44+5:302021-03-29T04:18:44+5:30

सातपुड्यात चारा साठवणुकीवर भर नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम व अति दुर्गम भागात उन्हाळ्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी आदिवासी बांधव ...

Demand for road repairs | रस्ते दुरुस्तीची मागणी

रस्ते दुरुस्तीची मागणी

सातपुड्यात चारा साठवणुकीवर भर

नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम व अति दुर्गम भागात उन्हाळ्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी आदिवासी बांधव मचाण तयार करीत त्यावर चारा साठवत आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्याच्या विविध भागांत चारा साठवण सुरू करण्यात आली आहे. दुर्गम भागात प्रत्येक घरासमोर चारा साठवणारे मचाण लक्ष वेधून घेत आहेत.

ग्रामपंचायतींना निधी देण्यासाठी पाठपुरावा

नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सांडपाणी निर्मूलनाचा बोजवारा उडाला आहे. गटारीच नसल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यांवर वाहत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देत निधी देण्याची अपेक्षा आहे. यासाठी ग्रामपंचायती पाठपुरावा करीत आहेत.

ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल

नंदुरबार : जिल्ह्यातील बँका सलग सुट्यांमुळे बंद आहेत. यात शहरी भागात लाॅकडाऊनही असल्याने एटीएममध्ये पैसे भरणा करण्यात आलेला नाही. यामुळे रविवारीही ग्रामीण भागातून पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

Web Title: Demand for road repairs