शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST2021-02-13T04:30:50+5:302021-02-13T04:30:50+5:30

बोरद : गेल्या काही महिन्यांपूर्वी बोरदसह परिसरात चक्रीवादळ व अवकाळी पाऊस् झाल्याने नुकसान झाले होते. यातून घरे आणि पिकांना ...

Demand for help to farmers | शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी

शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी

बोरद : गेल्या काही महिन्यांपूर्वी बोरदसह परिसरात चक्रीवादळ व अवकाळी पाऊस् झाल्याने नुकसान झाले होते. यातून घरे आणि पिकांना बाधा पोहोचली होती. यातील नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नसल्याने भरपाईची मागणी आहे.

शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी पाठपुरावा

बोरद : तळोदा तालुक्यातील मोड येथील शेतक-याने लागवड केलेल्या टरबूजाचे बियाणे हे निकृष्ट असल्याने त्यांना फटका बसला आहे. या शेतक-याला शासनासह संबधित कंपनीकडून भरपाई करुन देण्याची मागणी आहे.

काठी येथे वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण

धडगाव : अक्कलकुवा तालुक्यातील काठी व मालपाडा शिवारात देवखाडी येथे काठी ग्रामपंचायत सदस्य मीराबाई वळवी, कोळदे येथील कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ जयंत उत्तरावर आणि मोलगी परिसर सेवा समिती यांच्या मार्गदर्शनात वनराई बंधारा बांधण्यात आला. शेतकरी सरदारसिंग वळवी, मीराबाई वळवी, इनेस तडवी, फकिरा युसूफ शेख, यास्मिन शेख, मुमताज शेख, रोशनी फकिरा शेख, हुमेरा शेख, मालपाडा येथील राजेंद्र अमरसिंग पाडवी, जलसिंग करसन तडवी, मनोहर पाडवी यांनी श्रमदान केले.

Web Title: Demand for help to farmers