उघड्यावरील मांसविक्री बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST2021-02-05T08:06:54+5:302021-02-05T08:06:54+5:30

रस्त्यावरील चढाव कमी करण्याची मागणी नंदुरबार: अक्कलकुवा तालुक्यात सातपुड्याच्या डोंगराळ भागातील मौजे वेलखेडी ते पलासखोब्रा पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत ...

Demand for closure of open meat sales | उघड्यावरील मांसविक्री बंद करण्याची मागणी

उघड्यावरील मांसविक्री बंद करण्याची मागणी

रस्त्यावरील चढाव कमी करण्याची मागणी

नंदुरबार: अक्कलकुवा तालुक्यात सातपुड्याच्या डोंगराळ भागातील मौजे वेलखेडी ते पलासखोब्रा पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम सुरू असुन,या घाट सेक्शनच्या रस्त्यावर चढाव असल्याने वाहने वळणावरून चालवताना त्रास सहन करावा लागत असून वाहनधारकांकडून चढाव कमी करून संरक्षक भिंती तयार करण्याची मागणी होत आहे.

नियमबाह्य पेट्रोल-डिझेल विक्री

नंदुरबार: शहरासह परिसरातील पेट्रोल पंपावर नियमबाह्य बाटलीमध्ये पेट्रोल, डिझेल विक्री केली जात आहे. पंपावर कार्यरत कर्मचारी बाटली घेऊन येणाऱ्या व्यक्तीची कुठलीही ओळख न ठेवता बाटलीमध्ये किंवा कॅनमध्ये पेट्रोल व डिझेेल नियमबाह्य पद्धतीने विक्री करताना दिसून येत आहे. याकडे पेट्रोल संचालक सहसंबधित विभागाने दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे, संबंधितांनी दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Demand for closure of open meat sales