शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी दिलेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका यांना मालेगाव येथे कोविड कक्षात नियुक्ती देण्याचे आदेश ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका यांना मालेगाव येथे कोविड कक्षात नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ हे आदेश रद्द करण्याची मागणी होत आहे़ या पार्श्वभूमीवर खासदार डॉ़ हीना गावीत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ह्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी केली आहे़खासदार डॉ़ हीना गावीत व आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना (मॅग्मो), आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन (माडा) व जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी भेट घेतली होती़ या भेटीदरम्यान खासदार डॉ़ गावीत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्रव्यवहार झाला असून वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका यांच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी केल्याची माहिती दिली आहे़ या पत्रात जिल्ह्यातून गुजरात राज्यात गेलेले मजूर परत येत असून त्यांची तपासणी करुन त्यांना क्वारंटाईन करण्याच्या कामांचा बोजा आहे़ किमान ५० हजार मजूर परतत आहेत़ यामुळे वैद्यकीय अधिकाºयांचा ताण वाढला आहे़ आधी आकांक्षित जिल्हा असताना ४० टक्के पदे रिक्त असताना दुसरीकडे येथील कर्मचाºयांना पाठवल्यास कामावर ताण पडेल असे त्यांनी म्हटले आहे़दरम्यान खासदार डॉ़ गावीत यांच्यासह मॅग्मो, माडा व आरोग्य सेविकांच्या संघटनेने पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी, आमदार शिरीषकुमार नाईक आमदार राजेश पाडवी यांनाही निवेदन देऊन वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेविका यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे़ यावेळी मॅग्मोचे जिल्हाध्यक्ष डॉ. जर्मनसिंग पाडवी डॉ. योगेश वळवी, डॉ. सायसिंग पावरा, डॉ. प्रवीण चौरे, डॉ. सुरेश देसाई, ुसुरेखा वळवी, ज्योती संदानशिव, सुनिता वळवी, अर्चना ओगले, आशा घुगे आदी उपस्थित होत्या़