स्वखर्चातून साकारलेल्या उद्यानाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST2021-02-05T08:07:14+5:302021-02-05T08:07:14+5:30

या वेळी पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री ...

Dedication of the park at his own expense | स्वखर्चातून साकारलेल्या उद्यानाचे लोकार्पण

स्वखर्चातून साकारलेल्या उद्यानाचे लोकार्पण

या वेळी पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री ॲड. पाडवी म्हणाले की, चांगल्या आरोग्यासाठी व मनःशांतीसाठी उद्यानांची आवश्यकता आहे. मंदिर, चर्चमध्ये जाऊन जशी मनःशांती मिळत असते तशी निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर मिळते. त्यामुळे उद्यान हेदेखील एक मंदिर आहे. तळोदा शहरातील इतर उद्यानांकडेदेखील पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. शहराच्या विकासासाठी जो ही काही निधी लागेल त्यासाठी मी नेहमी तयार आहे, असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, अनिता संदीप परदेशी, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप परदेशी यांनी कोणत्याही निधीची वाट न पाहता स्वखर्चाने साकारलेल्या उद्यान निर्मिती उपक्रमाचे कौतुक केले.

प्रास्तविकेत हितेंद्र क्षत्रिय यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अविनाश मराठे तर आभार संदीप परदेशी यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Dedication of the park at his own expense