हातोडा रस्त्यावर आमदार निधीतून उभारलेल्या ओपन जीमचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST2021-05-06T04:32:46+5:302021-05-06T04:32:46+5:30

तळोदा-हातोडा रस्त्यावर उभारण्यात आलेल्या ओपन जीमचे लोकार्पण मंगळवारी पहाटे साडेसहा वाजता आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. लोकार्पणवेळी ...

Dedication of open gym built on MLA's fund on Hatoda Road | हातोडा रस्त्यावर आमदार निधीतून उभारलेल्या ओपन जीमचे लोकार्पण

हातोडा रस्त्यावर आमदार निधीतून उभारलेल्या ओपन जीमचे लोकार्पण

तळोदा-हातोडा रस्त्यावर उभारण्यात आलेल्या ओपन जीमचे लोकार्पण मंगळवारी पहाटे साडेसहा वाजता आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. लोकार्पणवेळी नगराध्यक्ष अजय परदेशी, तालुका अध्यक्ष बळीराम पाडवी, नगरसेवक योगेश पाडवी, हेमलाल मगरे, प्रदीप शेंडे, जगदीश परदेशी, नितीन पाडवी, प्रदीप बागूल, कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र माळी, पाणीपुरवठा विभागाचे नारायण चौधरी, स्वच्छता निरीक्षक अश्विन परदेशी, गिरीश मराठे, किरण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

आमदार निधीतून ओपन जीम निर्माण केली आहे. या जीममध्ये एअर वॉकर, लेग प्रेस स्टँडिंग ट्विस्टर, शोल्डर बिल्डर, लेग स्ट्रेसिंग मशीन यासारख्या विविध उपकरणांचा समावेश आहे. सकाळी व संध्याकाळी पायी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना या जीमचा फायदा होणार असल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

Web Title: Dedication of open gym built on MLA's fund on Hatoda Road