शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

केळीची रोपे खराब निघाल्याने शेतकऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

याबाबतचे वृत्त असे की, मे महिन्यात खरीप हंगामात शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील शेतकरी भटू पुरुषोत्तम सोनार यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील ...

याबाबतचे वृत्त असे की, मे महिन्यात खरीप हंगामात शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील शेतकरी भटू पुरुषोत्तम सोनार यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील एका कंपनीकडून आपल्या तीन एकर क्षेत्रात केळीची लागवड करण्यासाठी चार हजार टिशू कल्चर केळीची रोपे ६० हजार रुपयांत विकत घेतली होती. मोठ्या आकाराची, गोड, मजबूत बुंध्याची निर्यातक्षम केळीची रोपे असल्याची कंपनीने खात्री दिली होती. पीक पूर्ण होईपर्यंत खते, मशागत व पीक संरक्षण याबाबत संपूर्ण मार्गदर्शन कंपनी करणार होती. भटू सोनार यांनी आपल्या नवलपूर शिवारातील तीन एकर क्षेत्रात २५ मे रोजी केळीच्या रोपांची लागवड केली. परंतु गेल्या २० दिवसांत केळी रोपांना पाण्यासह लक्षपूर्वक राखण केली. परंतु रोपे वाळली असून रोपे मरू लागली आहेत. त्यामुळे खराब रोपे देऊन संबंधित कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे.

तक्रारीकडे दुर्लक्ष

शेतकरी भटू सोनार यांनी केळीची रोपे महिनाभरातच वाळायला लागली व रोपे वाळण्याचे कारण काय याबाबत मार्गदर्शनासाठी संबंधित एजंटसह कंपनीलादेखील संपर्क केला. परंतु संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.

नुकसानभरपाईची मागणी

तीन एकर क्षेत्रात चार हजार रोपांची लागवड केली होती. त्यात प्रति रोप १५ रुपये असा एकूण ६० हजार रुपयांचा रोपांसाठी खर्च व लागवडीसाठी १० ते १५ हजार रुपये खर्च असा ७० ते ७५ हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्याने केला होता. त्यात रोपे वाळून (जळून) शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित कंपनीवर कृषी विभागाने कारवाई करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

कर्ज काढून शेतात केळी रोपांची लागवड करण्यात आली होती. परंतु संबंधित कंपनीने खराब रोपे पाठवून फसवणूक केली आहे. याबाबत या कंपनीला खराब झालेल्या रोपांची माहिती दिली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. मला रोपांसह लागवडीसाठी ७० ते ७५ हजार रुपये खर्च झाला असून नुकसानभरपाई देण्यात यावी.

- भटू पुरुषोत्तम सोनार, शेतकरी, लोणखेडा, ता. शहादा