शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज स्वस्त, साहित्य महाग, मग घराचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

नंदुरबार : लाॅकडाऊननंतर वाळू, सिमेंट, सळई आणि विटांचे दर वाढले आहेत. दुसरीकडे बॅंकांनी मात्र गृहकर्ज स्वस्त केले आहे. ...

नंदुरबार : लाॅकडाऊननंतर वाळू, सिमेंट, सळई आणि विटांचे दर वाढले आहेत. दुसरीकडे बॅंकांनी मात्र गृहकर्ज

स्वस्त केले आहे. यामुळे घर बांधकामाचा खर्च वाढीव असल्याने खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने स्वप्नांचे घर अद्यापही आवाक्यात नाही.

बांधकाम साहित्य, दळणवळणाचा खर्च, मजुरांची पगार वाढ, स्टीलच्या दरात २५ टक्के वाढ, तर वाळूचा दरही जास्त झाल्याची माहिती आहे.

गावापासून घर स्वस्त, पण जाणे-येणे महाग

नंदुरबार शहराचा विस्तार हा दिवसेंदिवस वाढत आहे. शहराच्या चाैफेर घरांचे बांधकाम सुरू आहे. दुधाळे ते राकसवाडे, चाैैपाळे ते टोकरतलाव शिवार, होळतर्फे हवेली ते थेट वाधोदापर्यंत घरांची बांधकामे झाली आहेत. शहर हद्दीत आवाक्यातील प्लाॅट परवडत नसल्याने अनेकजण ग्रामीण हद्दीत स्वस्त प्लाॅट घेत घराचे बांधकाम करून घेत आहेत.

शहराचा विस्तार अजूनही तेवढा नसला, तरी शासकीय कर्मचारी, शिक्षक तसेच इतर मध्यमवर्गीय लोकांची घरे ही शहराबाहेरील हद्दीतच आहेत. येणे-जाणे महाग असले, तरी स्वस्तातील प्लाॅट खरेदीमुळे येथे घरे बांधणे सुकर झाल्याने अनेकांनी येण्या-जाण्याचा खर्च वाढता असूनही त्याकडे दुर्लक्ष केले.

शहरापासून तीन किलोमीटर अंतरातील राकसवाडे, वाघोदा, पातोंडा व होळतर्फे हवेली शिवारात दिवसेंदिवस एनए प्लाॅट वाढून घरांची बांधकामेही सुरू आहेत. येथील अनेकजण बांधकामाचे साहित्य गुजरात राज्यातून खरेदी करत खर्चावर नियंत्रण आणतात.

साहित्य विक्रेते म्हणतात

कोरोना व लाॅकडाऊनमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाल्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला आहे. यातून बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. यातून बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे.

- सुमित वाडिले,

बांधकाम साहित्य विक्रेता.

घर घेणे झाले कठीण

महागाई वाढली आहे. घर खरेदी करणे स्वप्नवत वाटत आहे. तयार असो की मग बांधकाम केलेले, सर्वच घरांच्या किमती वाढल्या आहेत. सामान्य व्यक्ती म्हणून घराचे स्वप्न अवघड वाटते.

- शोभा पाटील,

गृहिणी

देशात दोन वर्षांपासूनची कोरोनाची साथ आर्थिक मंदीला कारणीभूत आहे. व्यवसाय आता सुरू झाले आहेत. परंतु वाहतूक महागल्याने साहित्याचे दरही वाढले आहेत. ही दरवाढ बाजारपेठेवर परिणाम करत आहे. व्यावसायिकांना याचा सर्वात मोठा फटका बसत आहे.

- विजय अग्रवाल,

बांधकाम साहित्य विक्रेता.

लाॅकडाऊनपूर्वी शहर आणि शहरालगतच्या ग्रामीण हद्दीत नागरिकांच्या बजेटमध्ये प्लाॅट मिळत होते. परंतु मार्केटमध्ये एक मंदी सुरू आहे. नागरिक प्लाॅट खरेदीसाठी येतच नाहीत. कर्ज वगैरे मिळत असले, तरी अनेकांचा पैसा हा कोविडमध्ये खर्च झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.

- किरण पाटील, प्लाॅट व्यावसायिक.