सांरगखेडा येथील दत्तमंदिर शनिवार व रविवार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST2021-03-27T04:31:28+5:302021-03-27T04:31:28+5:30

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परिसरातील टाकरखेडा व निमगूळ गावांमध्ये कोरोनामुळे रुग्ण दगावल्याची घटना रोज घडत आहे. या गावातून ...

Datta Mandir at Sanragkheda closed on weekends | सांरगखेडा येथील दत्तमंदिर शनिवार व रविवार बंद

सांरगखेडा येथील दत्तमंदिर शनिवार व रविवार बंद

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परिसरातील टाकरखेडा व निमगूळ गावांमध्ये कोरोनामुळे रुग्ण दगावल्याची घटना रोज घडत आहे. या गावातून सारंगखेडा येथे येणाऱ्या नागरिकांमुळे सारंगखेडा येथे कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. सारंगखेडा येथे व्यापारी व ग्रामस्थांची बैठक घेऊन जनता कर्फ्यूचे पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सारंगखेडा गावात दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता जनता कर्फ्यू करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रसिद्ध व चारशे वर्षांची परंपरा असलेल्या दत्त मंदिर संस्थानने शासनाने दिलेल्या नियम व अटी शर्तीचे पालन करीत मंदिर दर्शनासाठी खुले असले तरी शनिवार, रविवार जनता कर्फ्यू असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊन कोरोना संसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.

सोमवारपासून मंदिर खुले, पण वेळमर्यादा

दत्त मंदिरात दररोज हजारो भाविक येत असल्याने दर्शनासाठी भाविकांची सामाजिक अंतर ठेऊन सोय व्हावी, म्हणून शासकीय मंदिर व शासन नियमांचे पालन करून सोमवार, २९ मार्चपासून संस्थानने ठरविलेल्या वेळेनुसार पहाटे ५ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर खुले राहणार असून इतर वेळेत बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी मंदिर संस्थान आणि शासन नियमावलीचे पालन करावे. मंदिरात विनामास्क भाविकांना सोडण्यात येणार नाही तसेच मंदिरात भाविकांनी सामाजिक अंतर ठेवून दर्शन घ्यावे, असे आवाहन दत्तमंदिर प्रमुख सचिव भिकन पाटील यांनी केले आहे.

Web Title: Datta Mandir at Sanragkheda closed on weekends