केळी पीक व शेतीपयोगी साहित्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 12:04 IST2020-05-02T12:03:58+5:302020-05-02T12:04:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी शिवारातील केळीची झाडे व शेतीपयोगी वस्तूंची नासधूस केल्याची घटना बुधवारी भरदुपारी ...

Damage to banana crop and agricultural inputs | केळी पीक व शेतीपयोगी साहित्याचे नुकसान

केळी पीक व शेतीपयोगी साहित्याचे नुकसान


लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी शिवारातील केळीची झाडे व शेतीपयोगी वस्तूंची नासधूस केल्याची घटना बुधवारी भरदुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून माथेफिरुंविरोधांचा पोलिसांनी तपास करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ब्राह्मणपुरी येथील नारायण पहाडा पाटील यांनी आपल्या ब्राह्मणपुरी शिवारातील सर्वे नंबर ९४/१ शेतात केळीची लागवड केली आहे. बुधवारी सकाळी नारायण पहाडा पाटील यांचा मुलगा राजेश्वर पाटील हे केळीच्या शेतात पाईपलाईनजवळील ठिबक सिंचनच्या नळी दुरुस्ती करण्याचे काम करीत होते. साडे अकरा वाजेच्या दरम्यान काम आटोपून ते घरी जेवणासाठी गेले होते. जेवण करून दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास आल्यावर त्यांना शेतातील केळीची फळधारणा झालेली १५ ते २० झाडे कापून तसेच पाण्याची मोटार बंद चालू करण्याच्या फ्यूजपेटीतील कटआऊट, पाण्याचा डुग्गा, पाईप लाईन फोडून ठिबक सिंचनच्या नळ्या अस्ताव्यस्त करून नासधूस केल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतपिकांचे व शेती साहित्याचे नुकसान करणाºया माथेफिरुंचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्रस्त शेतकºयांनी केली आहे.
दुष्काळात तेरावा महिना
सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आल्याने शेतमालाची विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यातच शेतकºयांचे पीक शेतात पडून असून शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पुढे केळी पिकाला भाव चांगला मिळेल या आशेने शेतकरी राबराब राबून आपले पीक जगवीत आहेत. त्यातच माथेफिरूंकडून अशाप्रकारे शेतपिकाची नासधूस होत असेल तर जगायचे कसे? असा प्रश्न शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे.


 

Web Title: Damage to banana crop and agricultural inputs