शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

किराणा खरेदीसाठी पुन्हा उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : किराणा व भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहरात सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : किराणा व भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहरात सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या लक्षणिय असल्याचे दिसून आले. शहरात विनाकारण फिरणाºयांवर करायचे काय, तसेच गर्दी कशी कमी होणार असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.शहरात कोरोनाचे चार रूग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने कन्टेन्मेंट झोनमधील सर्व प्रतिष्ठाने बंद केले होते. रविवारपासून नागरिकांना अत्यावश्यक वस्तू, किराणा माल व दूध खरेदी करण्यासाठी दररोज सकाळी आठ ते बारा या कालावधीत संचार बंदीमधून शिथिलता देण्यात आली आहे. मात्र याच काळात शहरात सर्वाधिक गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सींग या उद्देशाला हरताळ फासला जात आहे.सर्वाधिक जास्त गर्दी किराणा दुकानांमध्ये दिसून येत असून, जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी येणारे अनेक नागरिक चेहºयाला मास्क लावण्याचे सौजन्य दाखवत नाही. दररोज सकाळी चार तास किराणा दुकान उघडे राहणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असले तरी खरेदीला येणारे नागरिक मोठ्या प्रमाणात किराणा खरेदी करत असल्याने गर्दीचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेष म्हणजे किराणा दुकानातील अनेक साहित्याचे दर वाढलेले आहेत.दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने शहरात विनाकारण भटकण्याची जणूकाही स्पर्धाच लागली आहे. नागरिक मोटरसायकल घेऊन शहरात मनसोक्त भटकंती करत आहे. परिणामी शहरात सलग दुसºया दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी गर्दी करू नये, सुरक्षित अंतर ठेवा असे असे आवाहन केले जात असले तरी याचा फारसा परिणाम गर्दीवर जाणवत नव्हता. याउलट पोलिसांची गाडी गेली की पुन्हा जैसे थे परिस्थिती होत होती. विशेष म्हणजे कन्टेन्मेंट झोनमधील अनेक व्यापारी प्रतिष्ठाने सोमवारी खुली करण्यात आल्याने याच भागात गर्दीचे सर्वाधिक प्रमाण होते.

प्रशासनाच्यावतीने शहरातील पाच किलोमीटर अंतरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना व शेतीविषयक कामासाठी पेट्रोल डिझेल देण्यासाठी सूट असली तरी शहरात भटकंती करणाºया मोटरसायकल स्वारांना सहजरित्या पेट्रोल कसे काय उपलब्ध होते हा संशोधनाचा विषय झाला आहे. प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर तसेच विनाकारण शहरात फिरणाºयांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.