जयनगर येथे पीक कर्जवाटपाचे माहिती शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST2021-07-09T04:20:19+5:302021-07-09T04:20:19+5:30

शेतकरी बांधवांना पीक कर्ज आणि बँकेच्या विविध योजनांची माहिती मिळावी, या हेतूने युनिक फाउंडेशन आणि युनियन बँकेच्या संकल्पनेतून जयनगर ...

Crop loan information camp at Jayanagar | जयनगर येथे पीक कर्जवाटपाचे माहिती शिबिर

जयनगर येथे पीक कर्जवाटपाचे माहिती शिबिर

शेतकरी बांधवांना पीक कर्ज आणि बँकेच्या विविध योजनांची माहिती मिळावी, या हेतूने युनिक फाउंडेशन आणि युनियन बँकेच्या संकल्पनेतून जयनगर येथे सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराला युनियन बँकेचे नाशिक विभागप्रमुखांनी जयनगरसह परिसरातील उपस्थित सर्व ग्रामस्थांना बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच बँक आपल्यासोबत सहकार्य करत लवकरात लवकर कर्जास पात्र शेतकरी बांधवांना कर्ज मंजूर करेल, असा शब्द दिला. शिबिरात कर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या ग्रामस्थांची नावनोंदणी करण्यात आली. जयनगरसह परिसरातील ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिराला युनियन बँकेचे नाशिक विभागीय अधिकारी उपस्थित होते. सदर मान्यवरांचा गावातील नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन माजी पंचायत समिती सदस्य भगवान पाटील यांनी तर आभार विश्वनाथ पाटील यांनी मानले.

Web Title: Crop loan information camp at Jayanagar