चौकशी अहवालानंतर डॉक्टरवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:59 AM2020-01-21T11:59:06+5:302020-01-21T11:59:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ११ वर्षीय बालकास इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा पाय अधू झाल्याने तळोदा येथील डॉक्टराविरुद्ध उपनगर पोलिसात ...

Crime on doctor after investigation report | चौकशी अहवालानंतर डॉक्टरवर गुन्हा

चौकशी अहवालानंतर डॉक्टरवर गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ११ वर्षीय बालकास इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा पाय अधू झाल्याने तळोदा येथील डॉक्टराविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सकांनी नेमलेल्या समितीच्या अहवालानंतर सहा महिन्यांनी हा गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ.परेश वाणी, रा.तळोदा असे डॉक्टराचे नाव आहे. १९ जुलै २०१९ रोजी पथराई येथील सैनिकी विद्यालयात ११ वर्ष वयाच्या मुलाच्या पोटात दुखत असल्याने त्यांना डॉ.परेश वाणी यांनी तपासून इंजेक्शन दिले होते. इंजेक्शननंतर बालकाचा पाय अधू झाला होता. याबाबत बालकाच्या पालकांनी तक्रार दाखल केली होती. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी यासंदर्भात चौकशी समिती नेमली होती.
समितीच्या अहवालानंतर हवालदार कैलास मोरे यांनी उपनगर पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यावरून १९ रोजी डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार नाईक करीत आहे.

Web Title: Crime on doctor after investigation report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.