एक लाख १४ हजारांचे डिझेल चोरल्याने दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:29 IST2021-05-01T04:29:01+5:302021-05-01T04:29:01+5:30

नंदुरबार : डिझेल पंपाच्या टाकीचे झाकण उघडून त्यातून तब्बल एक लाख १४ हजारांचे १,३८० लिटर डिझेल दोघांनी चोरून नेल्याची ...

Crime against two for stealing diesel worth Rs 1 lakh 14 thousand | एक लाख १४ हजारांचे डिझेल चोरल्याने दोघांवर गुन्हा

एक लाख १४ हजारांचे डिझेल चोरल्याने दोघांवर गुन्हा

नंदुरबार : डिझेल पंपाच्या टाकीचे झाकण उघडून त्यातून तब्बल एक लाख १४ हजारांचे १,३८० लिटर डिझेल दोघांनी चोरून नेल्याची घटना पाचोराबारी, ता.नंदुरबारा शिवारात घडली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोराबारी शिवारात विजय शामराव मोहिते यांच्या मालकीचा डिझेल पंप आहे. तेथील भूमिगत डिझेलच्या टाकीचे झाकण उघडून विशाल धर्मेश वळवी रा. घोगलपाडा व त्याच्यासोबतचा एक जण असे दोघांनी एक हजार ३८० लिटर डिझेल चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याची किंमत एक लाख १४ हजार ३१९ रुपये इतकी आहे. २७ ते २८ एप्रिलदरम्यान ही घटना घडली. याबाबत पंप मालक विजय शामराव मोहिते यांनी तपास केला असता त्यांना विशाल वळवी व त्याच्या साथीदारावर संशय आल्याने त्यांनी दोघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार देवीदास सोनवणे करीत आहेत.

Web Title: Crime against two for stealing diesel worth Rs 1 lakh 14 thousand