शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नोकरीचे अमिष देत १८ लाख लाटणार्या संस्थाचालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 1:17 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील आदिवासी पारधी शैक्षणिक मंडळाच्या चेअरमनसह  तिघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा शहादा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील आदिवासी पारधी शैक्षणिक मंडळाच्या चेअरमनसह  तिघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा शहादा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. नोकरी देण्याचे आमिष दाखवून १८ लाख रूपयात सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केल्याच्या तक्रारी झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. आदिवासी पारधी शैक्षणिक संस्थेत २०१५ मध्ये वैशाली शत्रूघ्न   पाटील रा. होळ ता. शिंदखेडा  यांनी शिक्षक पदासाठी अर्ज केला होता. दरम्यान ही  नोकरी देण्याच्या बदल्यात संस्थाचालक देविदास मांगु सोनवणे, सचिव राहुल सोनवणे व मेहुल सोनवणे यांनी  १८ लाख रूपयांची मागणी वैशाली पाटील व त्यांच्या कुटूंबियांकडून केली होती. तिघांच्या भूलथापांना बळी पडून २०१५ मध्ये  सप्टेंबर २०१५ मध्ये वैशाली पाटील, त्यांचे कुटूंबिय व  अरुण अभिमान पाटील यांच्या उपस्थितीत रक्कम देण्यात आली होती. यातून २०१६ मध्ये  वैशाली पाटील यांची नंदुरबार येथील विस्तार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुलाखत घेत  नवागाव अनुदानित आश्रमशाळेत शिक्षण सेवक नियुक्तीचे पत्र देण्यात आले होते.  परंतू यानंतर त्यांना प्रत्यक्ष नोेकरीवर मात्र रूजू करुन घेण्यात आले नाही. वारंवार तगादा लावूनही संस्थाचालक सोनवणे यांच्याकडून टाळाटाळ केली गेली तसेच पैसे परत मागितल्यावर धमकी देण्यात आल्याने  वैशाली राहुल पाटील यांनी शहादा पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संस्थाचालक देविदास सोनवणे, सचिव राहुल सोनवणे व मेहुल सोनवणे यांच्या विरोधात  फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे करीत आहेत.दरम्यान या संस्थाचालकांना रक्कम देत फसवणूक झालेल्यांनी संपर्क करण्याचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी कळवले आहे.