भाजप पदाधिकाऱ्यांविरुद्ध जमावबंदी उल्लंघन प्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 11:59 IST2019-12-17T11:59:26+5:302019-12-17T11:59:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जमावबंदीचे उल्लंघन करून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे पोस्टर जाळल्या प्रकरणी भाजपच्या १६ पदाधिकारी ...

Crime against BJP office bearers | भाजप पदाधिकाऱ्यांविरुद्ध जमावबंदी उल्लंघन प्रकरणी गुन्हा

भाजप पदाधिकाऱ्यांविरुद्ध जमावबंदी उल्लंघन प्रकरणी गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जमावबंदीचे उल्लंघन करून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे पोस्टर जाळल्या प्रकरणी भाजपच्या १६ पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असतांना रविवारी सायंकाळी भाजप कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येत खासदार राहुल गांधी यांचे पोस्टर्स जाळले. यामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत पोलीस हवालदार धिरज कोमलेकर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार भाजपचे जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, अनुुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, नगरसेवक आनंदा बाबुलाल माळी, प्रशांत चौधरी, माणिक मोतीराम माळी, केतन दिलीपसिंग रघुवंशी, अशोक चौधरी, दिनेश मोहिते, भरत लोहार, बाबुलाल माळी, निर्मल शर्मा, जयेश चौधरी, प्रकाश चौधरी, सुदाम पटेल, विठ्ठल चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक माळी करीत आहे.

Web Title: Crime against BJP office bearers