जमीन खरेदीत फसवणूक 9 जणांविरूद्ध गुन्हा

By Admin | Updated: April 9, 2017 13:08 IST2017-04-09T13:08:16+5:302017-04-09T13:08:16+5:30

खोटे दस्ताऐवज तयार करून पथराई, ता.नंदुरबार शिवारातील शेती खरेदी केल्याप्रकरणी सहायक दुय्यम निबंधक, तलाठी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध नंदुरबार पोलिसात गुन्हा दाखल आहे.

Crime against 9 accused in land purchase fraud | जमीन खरेदीत फसवणूक 9 जणांविरूद्ध गुन्हा

जमीन खरेदीत फसवणूक 9 जणांविरूद्ध गुन्हा

 नंदुरबार,दि.9- खोटे दस्ताऐवज तयार करून पथराई, ता.नंदुरबार  शिवारातील शेती खरेदी केल्याप्रकरणी सहायक दुय्यम निबंधक, तलाठी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध नंदुरबार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजाराम जोगीदास पाटील रा.पथराई यांनी फिर्याद दिली आहे. 1972 ते सप्टेंबर 2005 या काळात भाऊ व इतरांनी खोटे दस्ताऐवज तयार करून शेती बेकायदेशीर खरेदी करून फसवणूक केली आहे. त्यावरून चुनिलाल जोगीदास पाटील, मनिलाल जोगीदास पाटील रा.पथराई, कैलास उत्तम पटेल रा.नंदुरबार, सुदाम काळू पाटील रा.पिंपळोद, स्टॅम्प वेंडर सुधाकर माधव वैद्य, व्यापारी हेमंत जयसिंग पाटील, पंकजसिंग पंडीत राजपूत, तत्कालीन दुय्यम निबंधक हिरे व तलाठी पी.ए.बच्छाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime against 9 accused in land purchase fraud