चौफुलीवरील खड्डामुळे अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:45 IST2020-03-06T11:45:15+5:302020-03-06T11:45:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाघेश्वरी चौफुलीवर स्वागत कमानीनजीक असलेला खड्डा वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे. याच ठिकाणी ड्रेनेज जाम ...

The crater on the chauffeur led to the accident | चौफुलीवरील खड्डामुळे अपघात वाढले

चौफुलीवरील खड्डामुळे अपघात वाढले


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वाघेश्वरी चौफुलीवर स्वागत कमानीनजीक असलेला खड्डा वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे. याच ठिकाणी ड्रेनेज जाम झाल्याने दुर्गंधी देखील पसरली आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच ही स्थिती असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
वाघेश्वरी चौफुुलीवरील स्वागत कमानीनजीक दातांचा दवाखाना आहे. या दवाखान्या शेजारीच ड्रेनेजचा खड्डा आहे. येथून भुमिगत गटारीद्वारे पाणी लगतच्या नाल्यात सोडण्यात आले आहे. ड्रेनेज करतांना मात्र या खड्डयावर स्लॅब टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे रस्त्याच्या अगदी लगत असलेल्या या खड्डयात अनेकवेळा चारचाकी व दुचाकी वाहने पडत आहेत. त्यात अनेकांना जायबंदी व्हावे लागत आहे.
याशिवाय गटार तुंबत असल्यामुळे घाण पाणी वाहत असते. दुर्गंधीही पसरत असते. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच ही स्थिती निर्माण झाल्याने पालिकेच्या स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडत आहे.

Web Title: The crater on the chauffeur led to the accident