शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करतांना समुपदेशनही करावे- जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:42 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शाळाबाह्य, स्थलांतरित, अनियमित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य ...

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शाळाबाह्य, स्थलांतरित, अनियमित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ

गावडे, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, सहायक जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, वीटभट्टी आणि ऊसतोडणी कामगाराच्या मुलांच्या शिक्षणाबाबत माहिती संकलित

करण्यात यावी. आश्रमशाळेत न आलेल्या मुलांची नोंद घेऊन त्यांच्या पालकांची भेट घेण्याचा प्रयत्न करावा.

स्थलांतरित पालकांची नोंद घ्यावी. त्यांच्याशी संपर्क करून मुलांना शाळेत पाठविण्याबाबत समुपदेशन करावे.

५० टक्क्यापेक्षा कमी उपस्थिती असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची भेट घेऊन मुलांना शाळेत

पाठविण्याबाबत त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात.

धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत नियोजन

करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ते म्हणाले, दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नसल्याने मुलांचे

ऑनलाइन शिक्षण होऊ शकत नाही. या भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे

कोरोनाविषयक नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याचे नियोजन करावे.

शाळा वर्गखोल्यांची कामे १५ मार्चपर्यंत पूर्ण करावीत. पुढील वर्षासाठी आवश्यक वर्गखोल्यांसाठी

तातडीने प्रस्ताव सादर करावे. दुर्गम भागात ५० पेक्षा अधिक विद्यार्थी असूनही वर्गखोली नसलेल्या शाळांना

प्राधान्य देण्यात यावे. शाळेच्या इमारती आणि परिसर सुंदर करण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.क