शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादकांना यंदा दिलासा सप्टेंबर अखेरपर्यंत विक्री करता येईल कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी होणारी गर्दी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता यंदा सीसीआयचे खरेदी केंद्र हे ३० सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, नंदुरबार कापूस खरेदी     केंद्रावर दररोज चार ते पाच हजार क्विंटल कापूस खरेदी होत आहे. भाव देखील समाधानकारक असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सुरुवातीपासूनच कापूसला यंदा चांगला भाव मिळत आहे. शेतकरी कापूस विक्रीसाठी देखील घाई करीत असल्याचे दिसून येत आहे. यंदा एक लाख हेक्टरयंदा जिल्ह्यात एक लाख हेक्टर कापूस लागवड झाली आहे. परंतु अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पादनावर यंदा परिणाम झाला आहे. कापूसची क्वाॉलीटी देखील खराब झाली असल्याचे चित्र होते. परंतु आता नंतर निघणारा कापूस हा चांगला दर्जाचा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. विक्रीसाठी झुंबडसीसीआयच्या विक्री केंद्रांवर कापूस विक्रीसाठी झुंबड उडत आहे. दररोज २०० पेक्षा अधीक वाहने विक्रीसाठी येत आहेत. साधारणत: पाच हजारापेक्षा अधीक कापूस येथे खरेदी होत आहे. होणारी गर्दी आणि त्यामुळे तोलाईसाठी लागणारा विलंब यामुळे शेतकरी नाराज होतात. त्यातून वाद देखील होत आहेत. ही बाब लक्षात घेता यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत कापूस खरेदी करण्याचा निर्णय सीसीआयने घेतला आहे. भाव समाधानकारककापसाला यंदा भाव बऱ्यापैकी मिळत आहे. चांगल्या दर्जाचा कापूस पाच हजार ७५० रुपयेपर्यंत विक्री होत आहे. तर कमी दर्जाचा कापूस हा किमान  पाच हजार ४३० रुपये क्विंटलपर्यंत विक्री होत आहे. खाजगी व्यापारींकडून अर्थात खेडा खरेदीत देखील साडेपाच हजारापर्यंत भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी चांगला दर्जाचा कापूस आणावा असे आवाहन करण्यात आले आहे. कमी दर्जाचा कापसाला सीसीआयच्या नियमानुसार कमी भाव द्यावा लागतो. त्यामुळे काही वेळा वाद देखील होतात. ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी चांगला कापूस विक्रीसाठी आणावा असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत अधीकसीसीआयच्या नंदुरबार व शहादा केंद्रात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत अधीक खरेदी झालेली आहे. ती आणखी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. सद्या वाढलेली आवक पहाता आणखी नऊ महिने खरेदी सुरू राहणार आहे.