शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

शुभेच्छा संदेशांवरही ‘कोरोना’चे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : हिंदू नववर्षाचा प्रारंभ असणाऱ्या गुढीपाडवा या सणावर आणि यानिमित्ताने आलेल्या शुभेच्छा संदेशातही कोरोनाचे सावट ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : हिंदू नववर्षाचा प्रारंभ असणाऱ्या गुढीपाडवा या सणावर आणि यानिमित्ताने आलेल्या शुभेच्छा संदेशातही कोरोनाचे सावट दिसून आले.हिंदू धर्मात गुढीपाडव्यापासून नववर्षाची सुरवात होते. गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या सणाला खूप महत्व आहे. गुढीपाडव्यास मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने विशेषत: महिला व मुलांचा आनंदाचा दिवस असतो. यंदाचा गुढीपाडवा मात्र कोरोनामुळे सर्वांसाठी नैराश्याचा झाला. प्रत्येक गुढीपाडव्यास वाहनांची, कापडांची, दागिन्यांची खरेदी होत असल्याने व्यापाऱ्यांची चंगळ असायची. या वेळी मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने नागरिकांना खरेदीच करता न आल्याने व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले. गुढीपाडव्याला घरोघरी गुढ्या उभारल्या जातात. या गुढ्यांना हार-कंगण लावले जातात. दरवर्षी हार- कंगणचा व्यवसायही मोठ्या प्रमाणावर होतो. यावेळी या व्यवसायावरही संक्रांत आली. नागरिकांना हार-कंगण न मिळाल्याने यंदा केवळ फुलांच्या माळा घालून गुढी उभारण्यात आली.गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरु होत असल्याने संदेशाची देवाणघेवाण होते. बुधवार, २५ मार्चपासून श्री शालिवाहन शके १९४२ चा प्रारंभ झाला. नववर्ष व गुढीपाडवानिमित्त यंदाही सोशल मिडियावर शुभेच्छा संदेशांचा अक्षरश: पाऊस पडला. मात्र यावेळी या शुभेच्छा संदेशावरही कोरोनाचे सावट दिसून आले. गुढीपाडव्याच्या संदेशात जगावरील कोरोनाचे संकट टळू दे म्हणून काहींनी देवाकडे प्रार्थना केली तर काहींनी या संकटाच्या काळात ज्यांच्यामुळे आम्ही सुखात घरात आहोत त्या सर्व डॉक्टर, नर्स, वॉर्ड स्टाफ, पोलीस व कर्मचारी यांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाचे संकट टळून सर्वांना निरोगी आयुष्य लाभो, आज मला हॉस्पिटलच्या रुपात मंदिर तर डॉक्टर व पोलिसांच्या रुपात देव दिसतोय, असेही संदेश शुभेच्छामधून देण्यात आले. नवीन वर्षात देशावरील कोरोनाचे संकट दूर होवो आणि प्रत्येकाला या रोगाशी लढण्याचे बळ मिळो, असाही संदेश गुढीपाडव्याच्या शुभेच्छांमधून देण्यात आला.