कोरोनाची संपर्क साखळी तोडणारच :जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:12 IST2020-06-27T12:11:53+5:302020-06-27T12:12:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात ...

Corona will break the chain of contact: Collector | कोरोनाची संपर्क साखळी तोडणारच :जिल्हाधिकारी

कोरोनाची संपर्क साखळी तोडणारच :जिल्हाधिकारी


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे आणि ज्येष्ठ नागरिक व गंभीर आजाराच्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. दरम्यान आणखी एक नवीन कोवीड कक्ष सुरू होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी. बोडके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.भारुड म्हणाले, नगरपरिषदेने ध्वनीक्षेपकाद्वारे प्रतिबंधक क्षेत्रातील नागरिकांना घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती द्यावी. संपर्क साखळी पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात यावा आणि आजाराची लक्षणे असणाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात यावे. एखाद्या कोरोना संसर्ग नसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये याबाबत प्रबोधन करण्यात यावे. तसेच अंत्ययात्रेस किंवा त्याच्या घरी २० पेक्षा अधिक नागरिक राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
एकलव्य इंग्लिश मिडियम स्कूल येथे नवे कोवीड केअर सेंटर दोन दिवसात तयार करावे. त्यासाठी अधिक मनुष्यबळ लावण्यात यावे. त्याठिकाणी विविध सुविधा, औषधे व आवश्यक साधनसामग्रीची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी. वैद्यकीय कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था त्याच परिसरात करण्यात येऊन त्यांना भोजन व इतर सुविधा उत्तम दर्जाच्या द्याव्यात. जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचाºयांना घ्यावयाच्या खबरदारीबाबत सूचना देण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले. नंदुरबार शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रात १८ सर्वेक्षण टीम कार्यरत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. 

Web Title: Corona will break the chain of contact: Collector