खाजगी आस्थापनाच्या शाळांचे शिक्षकही रोखणार कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:32 IST2021-04-02T04:32:03+5:302021-04-02T04:32:03+5:30

कोरोना महामारीत सद्या शाळा बंद असल्यामुळे तेथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सेवा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याची सक्ती प्रशासनाने केली ...

Corona will also stop teachers from private establishment schools | खाजगी आस्थापनाच्या शाळांचे शिक्षकही रोखणार कोरोना

खाजगी आस्थापनाच्या शाळांचे शिक्षकही रोखणार कोरोना

कोरोना महामारीत सद्या शाळा बंद असल्यामुळे तेथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सेवा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याची सक्ती प्रशासनाने केली असली तरी यात सर्वच शिक्षकांना बंधन कारक केले आहे. मात्र प्रशासनाच्या आदेश बाबत ज्येष्ठ शिक्षकानं मध्ये नाराजीच्या सुर उमटत आहे. बहुसंख्य शाळांमध्ये ज्येष्ठ शिक्षक आहेत. शिवाय त्यांना उच्च रक्तदाब,मधुमेह असे आजार आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्या मध्ये नाराजी पसरली आहे. एकीकडे शासनच उच्च रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांनी कोरोना पासून अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र नेमके प्रशासनाने कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहीत करताना वयाच्या संदर्भ दिलेला नाही. त्यामुळे अशा शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून प्रशासनाने त्याबाबात फेरविचार करावा. अशी शिक्षकांची मागणी आहे.

Web Title: Corona will also stop teachers from private establishment schools