शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यात कोरोना लसीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST

नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णालयात लसीकरण सुरू झाले. त्यापैकी प्रमुख असलेले नवापूर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रावर ज्येष्ठांनी गर्दी करत मोठ्या ...

नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णालयात लसीकरण सुरू झाले. त्यापैकी प्रमुख असलेले नवापूर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रावर ज्येष्ठांनी गर्दी करत मोठ्या उत्साहात लस घेतल्याचे दृष्य दिसून आले. मागील दोन दिवसांपासून कोविन ॲप बंद होते. त्यामुळे ज्येष्ठांची ऑनलाइन नोंदणी कशी करावी यासह अनेक बाबतीत संभ्रमाची स्थिती होती. नुकताच कोविन ॲप सुरू झाल्याने काही ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केली तर काहींनी थेट नवापूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्र गाठले. त्यामुळे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्रावरच नोंदणी करून लसीचा पहिला डोस घेतला. तांत्रिक अडचण सोडविण्यात आल्याने ज्येष्ठांना सहज लस उपलब्ध झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. याठिकाणी ज्येष्ठांमध्ये उत्साह दिसून आला. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत ६० वर्षावरील वयोवृद्ध ५० पेक्षा अधिक व्यक्तींनी कोरोनाचे लसीकरण घेतले आहे. तसेच ४५ ते ६० वयोगटातील आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही लसीकरण देण्यात येणार आहे. तसेच ज्यांचे रजिस्ट्रेशन होत नसेल अशा ज्येष्ठ नागरिकांचे रजिस्ट्रेशन नवापूर उपजिल्हा रुग्णालयात करून देण्यात येईल, अशी माहिती नवापूर उपजिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

नवापूर तालुक्यात ३६ रुग्णांवर उपचार

नवापूर तालुक्यात आतापर्यंत ८१७ कोरोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी ७६२ रुग्ण कोरोना नियंत्रित झाले आहेत. ३६ रुग्णांवर उपचार सुरू असून १९ रुग्णांचा कोरोनात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत नवापूर तालुक्यातून पाच हजार ६६५ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत.