शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
अंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
4
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
5
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
6
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
7
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
8
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
9
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
10
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
11
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
12
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
13
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
14
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
15
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
16
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
17
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
19
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
20
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमध्ये दररोज एक हजार नागरीकांची कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST

नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या आरटीपीसीआर लॅबमध्ये दरदिवशी होणा-या चाचण्यांची संख्या वाढली आहे. आजअखेरीस सरासरी एक हजार चाचण्या करण्यात येत ...

नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या आरटीपीसीआर लॅबमध्ये दरदिवशी होणा-या चाचण्यांची संख्या वाढली आहे. आजअखेरीस सरासरी एक हजार चाचण्या करण्यात येत असल्याने रुग्ण समोर येण्याचे प्रमाण वाढले आहे.

जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तत्कालीन स्थितीत जिल्ह्यात आढळून येणा-या रुग्णांची स्वॅब टेस्ट प्रारंभी पुणे व त्यानंतर धुळे येथे करण्यात येत होती. दरम्यान जुलै महिन्यात ट्रूनेट मशिन जिल्हा रुग्णालयाला देण्यात आले होते. हे मशिन काही काळ चालवल्यानंतर स्वतंत्र अशी आरटीपीसीआर लॅब जिल्ह्यासाठी सुरु करण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना चाचणी करण्याची ही एकमेव तरतूद असून याठिकाणी सरासरी १ हजार चाचण्या दररोज होत आहेत. या चाचण्या करण्यासाठी जिल्ह्यात स्वॅब संकलन केंद्र सुरु करण्यात आले असून निशुल्क अशा या सेवेच आतापर्यंत ९० हजार नागरीकांनी लाभ घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

१ हजार

जिल्ह्यात दररोज केल्या जाणा-या चाचण्या

जिल्हा रुग्णालयातील एकमेव लॅबमध्ये स्वॅब तपासण्या केल्या जात आहेत. काही ठिकाणी रॅपिड ॲंटीजेन टेस्ट होत असल्या तरी नागरीक आरटीपीसीआरला पसंती देतात.

८ हजार ७०३

चाचण्या जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात झाल्या

दरदिवशी जिल्ह्यातील किमान १ हजार नागरीकांचे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवल्याने आठवडाभरात वरील संख्येने चाचण्या झाल्या.

नंदुरबार जिल्ह्यात खाजगी लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्याची परवानगी अद्याप देण्यात आलेली नाही. कोरोना चाचणीच्या नावाखाली सिटी स्कॅन करुन छातीतील संसर्गाची माहिती देण्यात येत आहे. ही चाचणी खर्चिक आहे.

जिल्हा रुग्णालयात मोफत तपासणी होत असली तरी अनेक जण गुजरात राज्यात धाव घेत आहेत. गुजरात राज्यात कोरोना चाचणी करुन तेथेच उपचार घेण्याचे प्रकार सध्या घडत आहेत.

जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या मोफत होत असल्या तरीही अनेक जण सिटी स्कॅन करण्यावर भर देत आहेत. यासाठी वाढीव खर्च होत आहे.

सिटी स्कॅन करण्यासाठी साधारण अडीच ते तीन हजार रूपयांचा खर्च येतो. शहादा आणि नंदुरबार येथे सिटी स्कॅनसाठी तोबा गर्दी आहे.