शहरातील खाजगी दवाखान्यात बेडसाठी कोरोनाबाधितांना मोजावे लागताहेत पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST2021-03-25T04:28:56+5:302021-03-25T04:28:56+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात ॲक्टीव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सध्या ३ हजाराच्या घरात आहे. तर या रुग्णांना उपचार देण्यासाठी जिल्ह्यात खाजगी ...

Corona sufferers have to pay for beds in private hospitals in the city | शहरातील खाजगी दवाखान्यात बेडसाठी कोरोनाबाधितांना मोजावे लागताहेत पैसे

शहरातील खाजगी दवाखान्यात बेडसाठी कोरोनाबाधितांना मोजावे लागताहेत पैसे

नंदुरबार : जिल्ह्यात ॲक्टीव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सध्या ३ हजाराच्या घरात आहे. तर या रुग्णांना उपचार देण्यासाठी जिल्ह्यात खाजगी व शासकीय रुग्णालयांचे मिळून एकूण ८१६ बेड्स सध्या उपलब्ध आहेत. या सर्व बेडवर रुग्ण दाखल आहेत. यातून शिल्लक असलेल्या अनेक रुग्णांना वेटींगवर रहावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात आजअखेरीस १४ हजार ८९ जणांना कोरोना झाला आहे. तर दुसरीकडे १० हजार १८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे २६० जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाकडून जिल्हा रुग्णालयात १४० बेड्स तयार करण्यात आले होते. सोबत नंदुरबार, तळोदा, शहादा व नवापूर येथे कोविड केअर सेंटर तयार करुन ४९० बेड तयार केले आहेत. तर खाजगी रुग्णालयात ३०० बेड्स सध्या उपलब्ध आहेत.

दरम्यान रुग्णांसाठी वाढीव खाटा देण्याचे नियोजन आराेग्य विभागाने यापूर्वी करुन ठेवले होते. परंतू जिल्हा रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालयातील वाढीव खाटाही वापरात असल्याचे सांगण्यात आले आहे. परिणामी रुग्णांसाठी वाढीव खाटा कशा देणार असा प्रश्न आहे. जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयात वाढीव खाटा देत व्हेंटीलेटर व ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांच्या कामाकाजावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.

Web Title: Corona sufferers have to pay for beds in private hospitals in the city