नवापुर तालुक्यातील विसरवाडीतही कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 01:07 PM2020-06-02T13:07:54+5:302020-06-02T13:19:10+5:30

नंदुरबार/विसरवाडी : लॉकडाऊनच्या चार टप्प्यात कोरोनामुक्त असलेल्या नवापुर तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सोमवारी आढळून आला़ विसरवाडी येथील रुग्णाचा अहवाल ...

Corona patient in Visarwadi in Navapur taluka | नवापुर तालुक्यातील विसरवाडीतही कोरोना रुग्ण

नवापुर तालुक्यातील विसरवाडीतही कोरोना रुग्ण

googlenewsNext


नंदुरबार/विसरवाडी : लॉकडाऊनच्या चार टप्प्यात कोरोनामुक्त असलेल्या नवापुर तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सोमवारी आढळून आला़ विसरवाडी येथील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ही माहिती समोर आली असून दरम्यान शहादा येथील रझा मशिद परिसरातही एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात विसरवाडी येथील ४८ वर्षीय आणि शहादा येथील ४१ वर्षीय पुरुष असे दोघेही पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती़ दोघेही यापूर्वीच जिल्हा रुग्णालयात दाखल असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरु होता़ जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी व पथकांनी मंगळवारी सकाळीही याठिकाणी भेट देत सर्वेक्षण केले़


नवापुर तालुक्यातील प्रथम रुग्ण म्हणून नोंद असलेल्या ४८ वर्षीय पुरुषाबाबत दोन दिवसांपासून चर्चा सुरु होती़ मुंबई येथून परतलेल्या या व्यक्तीला आधीच क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान त्याच्या संपर्कातील १५ जणांना रात्रीच नवापुर येथे क्वारंटाईन कक्षात आणण्यात आले आहे़ मंगळवारी सकाळी आणखी १६ नागरिकांना क्वारंटाईन कक्षात नेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे़


नवापुर तालुक्यातील गडदानी येथील रहिवासी असलेला कोरोनाबाधित १७ रोजी मुंबई येथून परतला होता़ आल्यानंतर त्याने विसरवाडी येथे एका दवाखान्यात उपचार घेतले होते़ त्या डॉक्टर व परिचारिकेसही क्वारंटाईन करण्यात आले आहे़


विसरवाडी येथे उपचार घेणाऱ्या बाधिताने गावातच एकाकडून मसाज करवून घेतली होती़ संबधित मसाज करणारा व त्याच्या कुटूंबातील सहा जणांना नवापुर क्वारंटाईनमध्ये रवाना केले गेले़


नवापुर तालुक्यातील विसरवाडीतील माचाहोंडा, गडदानी, हळदाणी या परिसरात संबधित कोरोनाबाधित फिरला असल्याने हा संपूर्ण परिसर पाच दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे़

Web Title: Corona patient in Visarwadi in Navapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.