जिल्ह्यात एकाच दिवसात कोरोनाने १७ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:27 IST2021-04-05T04:27:08+5:302021-04-05T04:27:08+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रविवारी एकाच दिवसात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ...

Corona killed 17 people in a single day in the district | जिल्ह्यात एकाच दिवसात कोरोनाने १७ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात एकाच दिवसात कोरोनाने १७ जणांचा मृत्यू

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रविवारी एकाच दिवसात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात एका दिवसातील मृत्यूचा हा उच्चांक आहे. दरम्यान, जिल्ह्यात सात हजार ७१७ रुग्णांवर उपचार सुरू असून, रेमडिसिवीर इंजेक्शनसाठी आज शहाद्यात अक्षरश: रांगा लागल्या होत्या. नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी सायंकाळपर्यंत २५९ नवीन रुग्ण आढळले, तर १७ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी १४ जणांचा मृत्यू झाला होता. आज मृत्यूची संख्या वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. रेमडिसिवीर इंजेक्शनची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. हे इंजेक्शन मिळविण्यासाठी लोकांची प्रचंड धावपळ होत आहे. शहाद्यात कृषी भवनला सवलतीच्या दरात विक्री सुरू केल्याने या ठिकाणी इंजेक्शन खरेदीसाठी अक्षरश: रांगा लागल्या होत्या. रविवारी ५५० जणांनी रांगेत उभे राहून इंजेक्शन खरेदी केले.

Web Title: Corona killed 17 people in a single day in the district