ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST2021-04-06T04:29:05+5:302021-04-06T04:29:05+5:30

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे प्रमाण आता कमी असले तरी दर दिवशी ग्रामीण भागात शेकडो बाधित आढळून ...

As corona infection increases in rural areas | ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढताच

ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढताच

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे प्रमाण आता कमी असले तरी दर दिवशी ग्रामीण भागात शेकडो बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे हे प्रमाण नियंत्रित करण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे उभे झाले आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात लोकसंख्या कमी असते. तसेच बाजारपेठा लहान असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढीस फारसा वाव मिळणे कठीण असते. परंतु ग्रामीण भागातील जनतेचा शहरात विविध कामांसाठी होणारा प्रवास, नियमांच्या पालनाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागात कोरोना संसर्ग आटोक्याबाहेर गेला आहे. शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासनाने कठोर उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे.

धूरफवारणीची गरज

शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे. परंतु खासगी दवाखानेही हाऊसफुल्ल असून, गोरगरीब जनतेची पिळवणूक होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात होणाऱ्या साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत उपाययोजना करून धूरफवारणी करण्यात यावी, जेणेकरून साथीच्या आजारांना काही प्रमाणात आळा बसेल, अशी मागणी ग्रामीण भागातील जनतेकडून करण्यात येत आहे.

Web Title: As corona infection increases in rural areas