शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर शहरातील गुजर गल्ली कोरोना हॉटस्पॉट; १५ दिवसांत सहा जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST

गुजर गल्लीत तीन क्लिनिक असून, या ठिकाणी नवापूर शहरातील मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असल्याने मोठी वर्दळ असते. त्यामुळे ...

गुजर गल्लीत तीन क्लिनिक असून, या ठिकाणी नवापूर शहरातील मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असल्याने मोठी वर्दळ असते. त्यामुळे या भागात कोरोनाची लागण झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नगरपालिकेने अनेक वेळा निर्जंतुकीकरण केले आहे; परंतु नागरिकांचा हलगर्जीपणा यात दिसून येत आहे. तालुका प्रशासन उपाययोजना करीत असले तरी नागरिकांनी तोंडाला मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, हात स्वच्छ धुणे या तीन मूलमंत्रांचे पालन करणे गरजेचे आहे. नवापूर शहरातील दररोज कोरोना रिपोर्ट येत असल्याने, तसेच ॲम्ब्युलन्सचा आवाजदेखील धडकी भरवणारा आहे. नागरिकांनी कोरोनासंदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे. विनाकारण बाहेर न निघता घरातच सुरक्षित राहावे, असे आवाहन तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले आहे.

नवापूर शहरातील बहुतांश खासगी डॉक्टर कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे उपचार न करता घरीच औषध देऊन उपचार करीत असल्याने रुग्णांची परिस्थिती क्रिटिकल होत असल्याने शेवटच्या टप्प्यात रुग्ण रुग्णालयात दाखल होत असल्याने त्यांच्यावर उपचार करणे अवघड जात असून, त्यातून रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. नवापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, अल शिफा रुग्णालय मिशन हॉस्पिटल याठिकाणी कोविड सेंटर सुरू असून, येथे अनेक रुग्ण कोरोनाचा उपचार घेत आहेत.

दोन्ही राज्यांतील सीमा सीलबंद झाल्याने ृरुग्णांचे हाल

नवापूर शहर महाराष्ट्र व गुजरात सीमावर्ती भागात असल्याने बहुतांश रुग्ण उपचारासाठी गुजरात राज्यातील सोनगड, व्यारा, बारडोली, सुरत, नवसारी या परिसरामध्ये उपचार घेण्यासाठी जात आहेत. सुरत येथील सरकारी व खासगी रुग्णालयाची परिस्थितीदेखील नाजूक झाली. सर्वच रुग्णालये हाऊसफुल झाली आहेत. महाराष्ट्र व गुजरात राज्य सरकारने राज्याच्या सीमा सील केल्याने याचा मनस्ताप कोरोना रुग्णांना सहन करावा लागत आहे.

नंदुरबार जिल्हा व नवापूर तालुका कोरोना रिपोर्ट

नवापूर तालुक्यातदेखील कोरोनाने डोकेवर काढले आहे. नवापूर तालुक्यात नऊ हजार ३१३ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. एक हजार ४४५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ५०५ जण कोरोना आजारावर उपचार घेत असून, २४ जणांचा मृत्यू झाला आहे. ९१७ रुग्ण कोरोना नियंत्रित झाले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत ९१ हजार ५३८ लोकांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी १६ हजार ५६० कोरोना रुग्ण आढळून आले आहे. चार हजार ८३५ रुग्ण उपचार घेत असून, २८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ११ हजार ४३५ रुग्ण कोरोना नियंत्रित झाले आहेत.

नवापुरात व्हेंटिलेटरची आवश्यकता

नवापूर तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांची परिस्थिती खालावत असल्याने अनेकांना ऑक्सिजन लागत आहे, तर तालुक्यात व्हेंटिलेटरची कमतरता असल्याने रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यासाठी थेट नवापूरहून १२० किलोमीटर धुळे व सुरत येथे जावे लागत आहे. रुग्णाची हेळसांड थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नवापुरात व्हेंटिलेटर उपलब्धता करण्याची मागणी होत आहे.

पाच दिवसांच्या फरकाने कोरोनात पती-पत्नीचे निधन

नवापूर शहरातील गुजर गल्लीमध्ये रमेश काशीराम पाटील सेवानिवृत्त शिपाई यांचे पाच दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाल्याने पाच दिवसांनंतर त्यांची पत्नी सकूबाई रमेश पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या घरात दोन मुले असून, ती मूकबधिर आहेत. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असून, पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.