शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व लॉकडाऊनमुळे पाणीटंचाई निवारणाच्या कामावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात सरासरीच्या जवळपास ९० टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे फारशी पाणीटंचाई जाणवणार नाही अशी शक्यता होती; परंतु ...

जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात सरासरीच्या जवळपास ९० टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे फारशी पाणीटंचाई जाणवणार नाही अशी शक्यता होती; परंतु सर्वच भागांत पावसाची सरासरी कमी जास्त असल्यामुळे काही भागांत टंचाईच्या झळा बसल्या. त्यात सर्वाधिक ३९ गावे ही नंदुरबार तालुक्यात होती, तर सर्वाधिक १८७ पाडे धडगाव तालुक्यातील होते. यासह इतर तालुक्यांमधील गावांचादेखील त्यात समावेश होता. ऐन उन्हाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने उपाययोजनांच्या कामांवर परिणाम झाला आणि ती रखडली. विशेषत: विंधन विहिरींच्या कामांचा त्यात समावेश होता.

२६६ विंधन विहिरी

यंदा पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका हा पाड्यांना बसला. तब्बल २१४ पाडे पाणीटंचाईने होरपळले होते. त्यात धडगाव तालुक्यातील १८७, शहादा तालुक्यातील २५ व नवापूर तालुक्यातील दोन पाड्यांचा समावेश होता. अशा ठिकाणी पाणी योजना करणे शक्य राहत नाही शिवाय खासगी विहिरी व विंधन विहिरीही घेणे शक्य होत नाही, त्यामुळे तेथे कूपनलिका करून हातपंप बसविणे यालाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे यंदा तब्बल २६६ विंधन विहिरींचे नियोजन करण्यात आले होते. त्यात धडगाव तालुक्यात १८५, अक्कलकुवा तालुक्यात आठ, शहादा तालुक्यात ५५, नवापूर तालुक्यात १०, तर नंदुरबार तालुक्यात आठ विंधन विहिरींचा समावेश होता. त्यातील ८० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आला आहे.

३८ ठिकाणी अधिग्रहण

खासगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहण हे जिल्ह्यात ३८ ठिकाणी करण्यात आले होते. त्यात नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक ३१ तर नवापूर तालुक्यात ४, तळोदा तालुक्यात एक व धडगाव तालुक्यात दोन ठिकाणांचा समावेश होता.

दोन लाख लोकांना झळ

यंदा पाणीटंचाईची दोन लाख जणांना झळ बसली. त्यात नंदुरबार तालुक्यातील ८३ हजार २२७, नवापूर तालुक्यात ९,८५०, शहादा तालुक्यात ५९ हजार ४४, तळोदा तालुक्यात १,२३०, अक्कलकुवा तालुक्यात २६,६९४, तर धडगाव तालुक्यात २८,७७८ लोकसंख्येचा समावेश होता. एवढ्या लोकसंख्येला पाणीटंचाई निवारणार्थ एक कोटी ८७ लाख ८० हजार रुपयांच्या उपययोजना कामांचा समावेश होता.

तात्पुरत्या नळपाणी योजना नाहीत

मोठ्या गावांना पाणीटंचाईची झळ बसली नसल्याने दरवेळी घेतल्या जाणाऱ्या तात्पुरत्या पूरक नळ योजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, शेवड्या व बुडक्या करणे आदी कामे घेण्यात आली नाहीत. केवळ विंधन विहीर घेणे व खासगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करण्यावर भर देण्यात आला होता.

कामे अर्ध्यावर सोडू नयेत

पावसाळा लागला म्हणून टंचाई निवारणाची कामे अर्ध्यावर सोडू नयेत, अशी मागणी होत आहे. दुर्गम भागांतील अनेक विंधन विहिरींवर अद्यापही हातपंप बसविण्यात आलेले नाहीत. कोरोना व लॉकडाऊन काळात साहित्य उपलब्ध न होणे, मजूर न मिळणे यामुळे ही कामे रेंगाळली होती. आता ती कामे सुरू झाली असली तरी पावसाळा लागला म्हणून ती न करण्याकडेच अधिक कल असतो तसे न होता. झालेल्या सर्व विंधन विहिरींवर हातपंप बसवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने गांभीर्याने घ्यावे, अशी मागणी होत आहे.