शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे उन्हाळी पिकांचे लागवड क्षेत्रही झाले ‘डाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे पालन हे सर्वच ठिकाणी परिणामकारक ठरत असून उन्हाळी पिकांचे लागवड क्षेत्रही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे पालन हे सर्वच ठिकाणी परिणामकारक ठरत असून उन्हाळी पिकांचे लागवड क्षेत्रही यामुळे खालावले असल्याचे चित्र आहे़ आजअखेरीस जिल्ह्यात केवळ १९ हजार ३४० हेक्टर क्षेत्रातच उन्हाळी पिके तग धरुन आहेत़जिल्ह्यातील विविध भागात उन्हाळी धान्य पिकांसह, कडधान्य, तेलबिया, कांदा, भाजीपाला यासह टरबूज, केळी, पपई आणि ऊस आदी ४८ प्रकारच्या पिकांची लागवड करण्यात येते़ मे मध्यापर्यंत किमान साधारण ४० हजार हेक्टर क्षेत्राच्या पुढे होणाऱ्या या पिकांच्या लागवडीला यंदा ब्रेक लागला आहे़ मार्चपूर्वी केलेल्या उत्पादनांच्या तोडीवर परिणाम होऊन बाजारपेठ नसल्याने खराब झालेला माल तसेच व्यापाऱ्यांकडून दिले जाणारे मातीमोल दर यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले आहे़ याचा परिणाम एप्रिल व मे महिन्यात होणाºया उन्हाळी पिकांच्या लागवडीवर थेट झाला आहे़ यातून सावरण्यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन मिळत नसल्याने समस्या वाढत आहेत़ जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी बाजारपेठेअभावी शेतमाल स्वत:च बाजारात आणत असतानाही त्यांना नुकसानच सहन करावे लागल्याने चिंता वाढल्या आहेत़ येत्या दोन आठवड्यानंतर खरीप पेरण्यांनाही सुरुवात होणार आहे़ त्यासाठीचे नियोजन करावयाचे असल्याने उन्हाळी पिकांकडे पाठ फिरवली जात आहे़ प्रामुख्याने जमिनीची प्रत सुधारणा व जमिन आरोग्य राखण्यासाठी या पिकांची लागवड केली जाते़ लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात बियाणे, मजूर, खते, इलेक्ट्रीक साहित्य, ठिबक यासह मजूरांचे नियोजन न झाल्याने शेतकºयांना अडचणी आल्या होत्या़ यातून उन्हाळी पिके बारगळले आहेत़४जिल्ह्यात आजअखेरीस सर्व सहा तालुक्यांमध्ये १९ हजार ३४० हेक्टरवर उन्हाळी पिके आहेत़४उन्हाळी बाजरी १ हजार ४२६ हेक्टर, उन्हाळी मका १ हजार ६१९, मूग १ हजार ४४४, भूईमूग १ हजार ४१, सूर्यफूल १८२, बार्टी ४१ या धान्य, कडधान्य आणि तेलबिया पिकांची एकूण ६ हजार ३५५ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे़४तर दुसरीकडे फळे आणि भाजीपाला पिकांची एकूण १२ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे़ यात कांदा ७९०, वांगी ४७, मिरची ७५, भाजीपाला ४३२, टरबूज ८३४, केळी २७७, पपई ६७ तर ऊस ४ हजार ५८ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आला आहे़ एकूण १२ हजार ९८५ हेक्टरवर ही पिके आहेत़विशेष बाब म्हणजे यंदाही उन्हाळी पिकातून ज्वारी, तीळ, सोयाबीन हे बाद झाले असल्याचे दिसून आले आहे़ तर लागवड पिकांचे क्षेत्र हे कमीच आहे़जिल्ह्यात मिरची लागवड ही मे महिन्यापासून सुरु होते़ तूर्तास मात्र ही कामे रखडली आहेत़ रोप तयार करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने चिंता आहे़बºयाच ठिकाणी पपईची लागवड केली गेली असली तरी खत, क्रॉपकव्हर, ठिबक नळ्या टाकणे यासह इतर कामांना मजूर नसल्याने पपई लागवड १०० हेक्टरच्या आत आहे़ जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे पपई तोड थांबून शेतकºयांचे नुकसान झाले होते़ जिल्ह्यात दरवर्षी सरासरी २ हजार १०० हेक्टर पपई लागवड होते़कमी दिवसात भरघोस उत्पादन म्हणून शेतकरी टरबूजाला पसंती देत आले आहेत़ यंदा रमजानच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी लागवड वाढण्याची शक्यता होती़ परंतू लॉकडाऊनमुळे आधीचा माल न विकला गेल्याने उन्हाळी लागवड रखडून क्षेत्र निम्मे झाले आहे़