शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीच्या भूमिकेने ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:42 IST

अवैध कनेक्शनांना अभय नियमित वीज बिल भरणाऱ्या लोकांकडून वसुली करण्याचे धोरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी राबवत असले तरी दुसरीकडे ...

अवैध कनेक्शनांना अभय

नियमित वीज बिल भरणाऱ्या लोकांकडून वसुली करण्याचे धोरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी राबवत असले तरी दुसरीकडे त्यांना तळोदा शहरात अनेक ठिकाणी अवैध वीज कनेक्शन दिसत नाही का असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. तळोदा शहरात आणि इतर ठिकाणी बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी अनेक लोकांचे अवैध वीज कनेक्शन दिसून येतात. त्याचप्रमाणे शहरातदेखील अनेक ठिकाणी अवैध कनेक्शन घेऊन वीजपुरवठा सुरू असतो. याकडे वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वेळोवेळी करण्यात आला आहे. या अवैध वीज कनेक्शनला वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तर अभय नाही ना असा प्रश्नदेखील ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. या अवैध वीज कनेक्शनची वसुली ज्यादा वीज बिलांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांकडून केलीं जाते की काय असा संशयदेखील सर्वसामान्य ग्राहकांकडून व्यक्त करण्यात येतो. थकबाकीवरील व्याज माफ करावे. लॉकडाऊनच्या काळात अनेक ग्राहकांना जादा वीज बिले आली. अनेक ग्राहकांनी वीज बिल माफ होईल किंवा कमी होईल या आशेने बिल भरले नाहीत. त्यामुळे अनेक ग्राहकांचे बिल मोठ्या प्रमाणावर फुगले. त्यात जादा वीज देयकांची भर पडली. यामुळे हजारो रुपयांची वीज बिलांची थकबाकी प्रत्येक ग्राहकावर झाली. या वीज बिल थकबाकीवर वीज वितरण कंपनीकडून हजारो रुपयांचे व्याजदेखील आकारण्यात येत आहे. एकीकडे ग्राहक जादा वीज बिल भरत असताना त्यावर व्याज आकारून वीज वितरण कंपनीने सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडेच मोडले आहे. वीज बील भरणाऱ्या ग्राहकांना किमान थकबाकी वरील व्याज माफ करावे, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

रीडिंग घेणाऱ्या एजन्सीला दंड

तळोदा शहरासह इतर भागात वीज मीटरची रीडिंग घेणाऱ्या एजन्सीला कंपनीकडून ३९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. चुकीची रीडिंग येणे, अस्पष्ट रीडिंग घेणे व रीडिंग न घेता ग्राहकांना वीज बिल देणे, वेळेत रीडिंग न घेणे इत्यादी बाबी संबंधित वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते. दरम्यान, एजन्सीला कंपनीकडून दंड झाला असेल तरी एजन्सीच्या या भोंगळ कारभाराचा फटका ग्राहकांना बसला. एजन्सीला दंड आकारला गेल्याने वीज बिलासंदर्भात मोठ्या प्रमाणात अनागोंदी होत असल्याचे शिक्कामोर्तब झाले असल्याचे सांगितले जाते.